IND vs ENG : चौथ्या कसोटीत रोहित शर्मा कोणाला दाखवणार बाहेरचा रस्ता? का आणि कशासाठी ते जाणून घ्या
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेत भारताने जबरदस्त कमबॅक केलं. पहिला सामना गमवल्यानंतर सलग दोन सामन्यात विजय मिळवला आहे. दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाने बाजी मारली आहे. पण चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माचं टेन्शन वाढलं आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला स्थान द्यायचं आणि कोणाला काढायचं हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत तीन कसोटी सामने झाले असून टीम इंडियाने 2-1 ने आघाडी घेतली आहे. भारताने मालिकेतील पहिला सामना गमवला होता. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या जबरदस्त कमबॅक केलं. आता चौथा कसोटी सामना 23 फेब्रुवारीपासून रांची येथे खेळला जाणार आहे. हा सामना भारताने जिंकल्यास थेट मालिका खिशात असेल. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान होईल. पण चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. कारण चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी केएल राहुल फिट अँड फाईन असेल. त्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान द्यायचं कोणाला बसवायचा हा प्रश्न आहे. त्याचबरोबर जसप्रीत बुमराहला चौथ्या कसोटी सामन्यात आराम दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्या जागी कोण खेळणार? हा देखील प्रश्न आहे.
केएल राहुल पहिला कसोटी सामना खेळला होता. त्यात दुखापतग्रस्त झाल्याने त्यानंतरच्या दोन कसोटी सामन्यात खेळला नाही. पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने 86 आणि दुसऱ्या डावात 22 धावा केल्या होत्या. उर्वरित तीन सामन्यात केएल राहुलची निवड करण्यात आली आहे. पण पूर्णपणे फिट झाला तरच खेळणार अशी अट होती. आता तो फिट झाला तर रजत पाटीदारला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. कारण दोन सामन्यात त्याची कामगिरी हवी तशी झाली नाही. तर सरफराज आणि ध्रुव जुरेल यांनी सर्वोत्तम प्रदर्शन केलं आहे. त्यामुळे त्याच्यावर टांगती तलवार आहे.
चौथ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला आराम दिला जाऊ शकतो. सलग तीन सामन्यात जसप्रीत बुमराह खेळला आहे. त्यामुळे मोहम्मद सिराजसोबत मुकेश कुमार मैदानात असेल. पण एक वेगवान बॉलर घेऊन खेळायचं झालं तर अक्षर पटेलला संधी मिळू शकते. रोहित शर्माने नुकतीच एक इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने युवा खेळाडूंचं कौतुक केलं आहे. यात यशस्वी जयस्वाल, सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांचं नाव आहे. त्यामुळे या तिघांना चौथ्या कसोटी सामन्यात स्थान मिळणार यात काही शंका नाही. आता रोहित शर्मा चौथ्या कसोटीत कोणता संघ उतरतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.