Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : मालिका विजयानंतर पाचव्या सामन्यात या खेळाडूंना संधी, नाणेफेकीनंतर भारताच्या वाटेला फलंदाजी

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवा टी20 सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होत आहे. पाच सामन्यांची मालिका भारताने आधीच 3-1 ने खिशात घातली आहे. त्यामुळे हा औपचारिक सामना असून सूर्यकुमार यादवने प्लेइंग 11 मध्ये बदल केला आहे. दडपण नसल्याने खेळाडूंना फॉर्मात येण्यासाठी हा सामना महत्त्वाचा ठरेल.

IND vs ENG : मालिका विजयानंतर पाचव्या सामन्यात या खेळाडूंना संधी, नाणेफेकीनंतर भारताच्या वाटेला फलंदाजी
Follow us
| Updated on: Feb 02, 2025 | 6:41 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना मुंबईत होत आहे. आतापर्यंत झालेल्या चार सामन्यात भारताने मालिका 3-1 ने खिशात घातली आहे. त्यामुळे हा सामना औपचारिक असल्याने भारतीय संघावर तसं कोणतं दडपण नसेल. त्यामुळे या सामन्यात काही खेळाडूंना फॉर्मात येण्याची संधी आहे. खासकरून कर्णधार सूर्यकुमार यादव फॉर्मात परतण्यासाठी प्रयत्नशील आहे. चार सामन्यात त्याला स्लोअर आर्म गोलंदाजी करून इंग्लंडने बरोबर गुंतवलं. त्यामुळे पाचव्या सामन्यात कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दव फॅक्टर लक्षात ठेवून मोठा स्कोअर उभारण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

जोस बटलरने सांगितलं की, ‘आम्ही पॅचमध्ये काही चांगले क्रिकेट खेळलो. तरी आम्ही ते अधिक चांगल्या प्रकारे अंमलात आणायला हवे होते. गेममधील खास क्षण टिपण्याची गरज आहे. संघात चांगलं वातावरण आहे, एक चांगले ठिकाण आहे आणि खूप गर्दी आहे. ही एक चांगली विकेट आहे, मार्क वुड परत आला. दोन्ही संघ हाय-ऑक्टेन आहेत.’

कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितलं की, ‘आम्हाला प्रथम फलंदाजी करायची होती, चांगली विकेट दिसते. मला आशा आहे की जास्त दव पडणार नाही. आज रात्री हे स्टेडियम खचाखच भरेल. त्याची जबाबदारी मुलांनी घ्यावी, अशी आमची मागणी आहे आणि तेच ते करत आहेत. तुम्ही काहीवेळा अयशस्वी व्हाल, विशेषत: जेव्हा तुम्ही उच्च जोखीम, मोठा खेळ खेळता. शमीला संघात स्थान मिळालं आहे. अर्शदीप सिंगऐवजी घेतलं आहे.’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड

विधानसभेत अजित पवारांना मिळाली जयंत पाटलांची साथ
विधानसभेत अजित पवारांना मिळाली जयंत पाटलांची साथ.
खोक्या भाईसह धसांनाही सहआरोपी करा, अजय मुंडेंची मागणी
खोक्या भाईसह धसांनाही सहआरोपी करा, अजय मुंडेंची मागणी.
धमकीच्या ऑडिओ क्लिपमधला आवाज माझाच - संदीप क्षीरसागर
धमकीच्या ऑडिओ क्लिपमधला आवाज माझाच - संदीप क्षीरसागर.
रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवा..
रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवा...
शिंदेंच्या काळातल्या योजनांना कात्री? अर्थसंकल्पात निधीची तरतूद नाही
शिंदेंच्या काळातल्या योजनांना कात्री? अर्थसंकल्पात निधीची तरतूद नाही.
न्यायदान कक्षातच रंगतात ओल्या पार्ट्या, Video व्हायरल
न्यायदान कक्षातच रंगतात ओल्या पार्ट्या, Video व्हायरल.
बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव
बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव.
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा.
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.