IND vs ENG | रोहित शर्माचा तडाखा, इंग्लंड विरुद्ध धमाकेदार शतक
Rohit Sharma Century | हिटमॅन रोहित शर्मा याने इंग्लंड विरुद्ध खणखणीत शतक ठोकलंय. रोहितच्या या शतकासह टीम इंडियाने इंग्लंडला आणखी बॅकफुटवर ढकललंय.
धर्मशाला | टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी दमदार शतक ठोकलंय. रोहितचं हे इंग्लंड विरुद्धच्या सुरु कसोटी मालिकेतील दुसरं आणि कारकीर्दीतील 12 शतक ठरलंय. रोहितने या शतकी खेळीदरम्यान चौफेर फटकेबाजी करत इंग्लंडच्या गोलंदांजाचा समाचार घेतला. रोहितने केलेल्या शतकामुळे टीम इंडिया आणखी मजबूत स्थितीत पोहचली आहे.
रोहित शर्माला हे शतक पूर्ण करण्यासाठी 154 चेंडूंचा सामना करावा लागला. रोहितने 64.94 च्या स्ट्राईक रेटने हे शतक झळकावलं. रोहितच्या या शतकी खेळीत 3 सिक्स आणि 13 चौकारांचा समावेश होता. रोहितच्या या शतकानंतर टीम इंडियाचे दिग्गज दिलीप वेंगसरकर यांनी उभं राहून हिटमॅनचं अभिनंदन केलं.
रोहितनंतर शुबमन गिल यानेही शतक पूर्ण केलं. दोघांच्या शतकी खेळीमुळे टीम इंडियाने पहिल्या डावात आघाडी घेतली. त्यानंतर लंच ब्रेक झाला. मात्र लंचब्रेकनंतर इंग्लंडने कमबॅक केलं. इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स याने टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याला आऊट केलं. रोहित शर्मा 103 धावा करुन आऊट झाला. रोहित पाठोपाठ शुबमन गिल यानेही मैदानाबाहेरचा रस्ता धरला. शुबमन गिल याला जेम्स एंडरसन यानेही क्लिन बोल्ड केलं. शुबमन याने 150 बॉलमध्ये 110 धावांची खेळी केली. शुबमन आणि रोहित या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 171 धावांची मोठी भागीदारी केली.
रोहित-शुबमनची शतकी खेळी
It’s Lunch on Day 2 of Dharamsala Test!
A 129-run First Session for #TeamIndia as captain Rohit Sharma & Shubman Gill zoomed past hundreds 👏 👏
Stay Tuned for Second Session ⌛️
Scorecard ▶️ https://t.co/jnMticF6fc #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/P5WFrukIw8
— BCCI (@BCCI) March 8, 2024
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, देवदत्त पडीक्कल, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन आणि शोएब बशीर.