IND vs ENG : शेवटच्या कसोटीत या खेळाडूंकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा, कॅप्टन्सीसह हे प्लेयर्स सोडवतील पॉइंट्सचं गणित!
भारत इंग्लंड पाचवा कसोटी सामना धर्मशाळा येथे होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहे. पण मालिका भारताने आपल्या खिशात घातली आहे. त्यामुळे दोन्ही पाचवा सामना जिंकून शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात असतील. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका खूपच महत्त्वाची ठरणार आहे. असं असताना कोणते खेळाडू चमकदार कामगिरी करू शकतात हे जाणून घेऊयात.
मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामन्यात कोणते खेळाडू चमकतील याचा अंदाज बांधला जात आहे. 22 खेळाडूंपैकी बोटावर मोजण्या इतके खेळाडू आपली छाप सामन्यात सोडतात. फक्त कोणत्या खेळाडू बाजी मारेल आणि कोण पॉइंट्सच्या गणितात पुढे नेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. कधी कधी दुबळा खेळाडू मोठी कामगिरी करून जातो, त्यामुळे आश्चर्याचा धक्का बसतो. असं सगळं गणित पाहता स्वप्नपूर्ती करणाऱ्या खेळाडूंबाबत भाकीत करणं हे काही कोणाला शक्य नाही. त्यातल्या त्यात एक ढोबळमानाने अंदाज बांधला जाऊ शकतो की दोन्ही संघातील हे खेळाडू चांगली कामगिरी करू शकतात. त्यात कर्णधार आणि उपकर्णधाराची निवड योग्य ठरली आणि नशिबाने साथ दिली तर यश नक्कीच पदरात पडू शकते. भारताने पाच सामन्यांची कसोटी मालिका 3-1 ने जिंकली आहे. त्यामुळे पाचवा कसोटी सामना औपचारिकता असून भारताचं पारडं जड आहे. पण इंग्लंडही सहजासहजी हा सामना सोडणार नाही, हे देखील तितकं खरं आहे.
धर्मशाळेतील वातावरण सध्या एकदम थंड आहे. पाऊस आणि मधेमधे बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे वातावरण एकदम इंग्लंडला पूरक असं आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. पण खेळपट्टी फिरकीपटूच्या बाजूच्या असल्यास हे गणित फिस्कटू शकतं. या खेळपट्टीचा अंदाज घेऊन भारतीय संघात दोन बदल होऊ शकतात. भारताच्या ताफ्यात जसप्रीत बुमराहचं अस्त्र सहभागी होईल. आकाशदीप किंवा कुलदीपच्या जागी त्याला संधी मिळेल. तसेच रजत पाटिदारची जागा देवदत्त पडिक्कल याला मिळू शकते. इंग्लंडने एक दिवस आधीच प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन : बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन आणि शोएब बशीर.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, देवदत्त पडिक्कल/रजत पाटीदार, सरफराज खान, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
ड्रीम इलेव्हन टीम 1 : शुबमन गिल(कर्णधार) ध्रुव जुरेल (विकेटकीपर) यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, ओली पोप, बेन स्टोक्स, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, टॉम हार्टले, जसप्रीत बुमराह.
ड्रीम इलेव्हन टीम 2 : यशस्वी जयस्वाल (कर्णधार) बेन फोक्स (विकेटकीपर), रोहित शर्मा, शुबमन गिल, ओली पोप, रविंद्र जडेजा, बेन स्टोक्स, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, टॉम हार्टले, जसप्रीत बुमराह.