IND vs ENG : 500 ते 501 विकेटदरम्यान बरंच काही घडलं, आर अश्विनच्या पत्नीची भावुक पोस्ट
आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट्सचा पल्ला गाठला आहे. अशी कामगिरी करणारा अनिल कुंबलेनंतर दुसरा फिरकीपटू आहे. पण या 500 व्या विकेटचं सेलिब्रेशन करताना त्याला मध्यातच सामना सोडावा लागला. तिसऱ्या दिवशी खेळला नाही आणि थेट चौथ्या दिवशी दुसऱ्या सत्रात एन्ट्री मारली. या 48 तासात बरंच काही घडल्याचं आर अश्विनच्या पत्नीने सांगितलं आहे.
मुंबई : इंग्लंडविरुद्धचा राजकोट येथील सामना भारताने मोठ्या फरकाने जिंकला. इंग्लंडला 443 धावांनी पराभूत करत मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडने बऱ्यापैकी टीम इंडियाचा घाम काढला होता. त्या दिग्गज फिरकीपटू आर अश्विनला मध्यातच सामना सोडण्याची वेळ आली. त्यामुळे पुढे काही खरं नाही असंच वाटत होतं. पण भारताच्या इतर गोलंदाजांनी डाव सावरला. तर आर अश्विन तिसऱ्या खेळला नाही आणि चौथ्या दिवशी त्याची सामन्यात एन्ट्री झाली. दुसऱ्या सत्रात आर अश्विनने एक गडी बाद केला. सामना मध्यात सोडण्यापासून ते परत येण्याच्या 48 तासांच्या कालावधीत बरंच काही घडलं. कौटुंबिक कारणास्तव आर अश्विनला सामना सोडावा लागला होता. त्यानंतर आर अश्विनच्या पत्नीने त्या 48 तासांची दु:ख सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे. 500 ते 501 विकेट दरम्यान बरंच काही घडल्याची भावुक पोस्ट अश्विनच्या पत्नीने लिहिली आहे.
आर अश्विनच्या पत्नीने काय लिहिलं आहे?
“आम्हाला वाटल की हैदराबादमध्ये 500 विकेटचा पल्ला पूर्ण होईल. पण तसं काही झालं नाही. विशाखापट्टणममध्येही तसं होऊ शकलं नाही. मी मिठाई विकत आणली होती आणि 499 व्या विकेटवर सर्वांना वाटली. 500 वी विकेट आली आणि सर्वकाही शांतपणे गेलं. 500 आणि 501 व्या विकेटदरम्यान बरंच काही घडलं. आमच्या आयुष्यातील 48 तासांचा अवधी सर्वात कठीण होता. पण 500 आणि त्यापूर्वी 499 व्या विकेटची गोष्ट आहे. अलौकिक कामगिरी आहे. मला तुझा अभिमान आहे. आम्ही सर्व तुझ्यावर प्रेम करतो. “, अशी भावुक पोस्ट रविचंद्रन अश्विनच्या पत्नीने केली आहे.
View this post on Instagram
बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितलं होतं की, “आर अश्विनच्या आईची तब्येत बिघडली होती.” आर अश्विनबाबत तिसऱ्या दिवशी समालोचन करत असताना दिनेश कार्तिक सांगितलं होतं की, पंचांकडून परवानगी मिळाली आहे की तो थेट येऊन गोलंदाजी करू शकतो. आर अश्विनने जॅक क्राउलीची विकेट घेत 500 बळी घेण्याचा टप्पा गाठला होता. 98 कसोटी सामन्यात 11993 धावा देत 501 गडी बाद केले आहेत. आर अश्विनने 34 वेळा पाच गडी बाद केले आहेत.