IND vs ENG : मालिका गमावल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचं डोकं फिरलं, पराभवाचं खापर असं फोडलं

इंग्लंडच्या बेझबॉल रणनितीची टीम इंडियाने हवा काढली. पाच सामन्यांची कसोटी मालिका 4-1 ने गमावली. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित फिस्कटलं आहे. तिसऱ्या पर्वातही अंतिम फेरी गाठणं काही शक्य होताना दिसत नाही. मालिका पराभवानंतर कर्णधार बेन स्टोक्स चांगलाच तापलेला दिसला.

IND vs ENG : मालिका गमावल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचं डोकं फिरलं, पराभवाचं खापर असं फोडलं
मालिका गमावल्यानंतर बेन स्टोक्सच्या तळपायाची आग मस्तकात, सामन्यानंतर म्हणाला...
Follow us
| Updated on: Mar 09, 2024 | 5:13 PM

मुंबई : पाचव्या कसोटी सामना जिंकून शेवट गोड करण्याचा इंग्लंडचं स्वप्न भंगलं आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून इंग्लंडने बेझबॉलची हवा केली होती. पण उर्वरित चार सामन्यात बेझबॉलची हवा गूल झाली. टीम इंडियाने नवोदित खेळाडूंच्या जोरावर ही मालिका जिंकली. दिग्गज खेळाडू नसताना टीम इंडियाने इंग्लंडला पराभवाचं पाणी पाजलं. इंग्लंडने पहिल्या सामन्यात 28 धावांनी विजय मिळवला. पण त्यानंतर टीम इंडियाने डोकंच वर काढू दिलं नाही. या पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स चांगलाच संतापला आहे. त्याने या पराभवाचं कारण सांगताना खेळाडूंच कान टोचले आहेत. “या मालिकेतील पराभवाचं मोठं कारण म्हणजे संधीचा योग्य फायदा न घेणे.”, असं त्याने एका वाक्यात सांगितलं. त्यानंतर संघातील खेळाडूंना खडे बोल सुनावले. खेळाडूंची स्तुती करताना काय काय चुका झाल्या याचा पाढा वाचला. आम्ही एका चांगल्या संघाकडून मालिका गमवल्याचंही बेन स्टोक्सने सांगितलं.

“आम्ही एका चांगल्या संघाकडून मालिका हरल. येथून पुढे आम्हाला बरंच क्रिकेट खेळायचं आहे. त्यामुळे आता आमचं लक्ष आता तिकडे आहे. संपूर्ण मालिका पाहाल तर आम्हाला संधीचं सोनं करता आलं नाही. आम्ही वैयक्तिकरित्या जाणतो की, चुका नेमक्या कुठे केल्या ते. जेव्हा भारतीय गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात तेव्हा जवळपास सर्वच खेळाडू फिल्डिंग करताना दिसतात. त्यामुळे धावा करण्यासाठी नवीन मार्ग शोधणं गरजेचं आहे. अशात तुम्ही धोका पत्कारला तर तुमच्या बाजूने किंवा विरोधात जाऊ शकतो.”

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने खेळाडूंना सुनवताना काही जणांचं कौतुकही केलं, ‘झॅक क्राउली आणि बेन डकेटने चांगली ओपनिंग केली. बशीर आणि हार्टलीने पूर्ण मालिकेत चांगली कामगिरी केलीय. तर जो रुटचा फॉर्म परतणं हे आमच्या शुभ संकेत आहेत. जेम्स अँडरनसोबत फिल्डवर वेळ घालवणं एक चांगली अनुभूती आहे. एका वेगवान गोलंदाजाने 700 गडी बाद करणं अद्भूत आहे. त्याच्यासारखा फिट खेळाडू मी अद्याप पाहिला नाही.’

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.