Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : चौथ्या कसोटीत टीम इंडियाच्या मनासारखं झालं नाही, रोहित शर्मा स्पष्टच म्हणाला की…

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या सत्रावर भारताने पकड मिळवली. तर जो रुटने इंग्लंडसाठी एकाकी झुंज सुरु ठेवली आहे. असं असताना या सामन्यात टीम इंडियाच्या मनासारखं झालं नाही. हे दु:ख रोहित शर्माने बोलून दाखवलं.

IND vs ENG : चौथ्या कसोटीत टीम इंडियाच्या मनासारखं झालं नाही, रोहित शर्मा स्पष्टच म्हणाला की...
IND vs ENG : चौथ्या कसोटी इंग्लंडचं नाणं खणखणीत वाजलं, टीम इंडियाला धक्का बसला! रोहित शर्माने सांगितलं की..
Follow us
| Updated on: Feb 23, 2024 | 1:34 PM

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना सुरु आहे. भारताने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे चौथा कसोटी सामना भारतासाठी निर्णायक ठरणार आहे. तर मालिकेत कमबॅकसाठी इंग्लंडचा प्रयत्न असणार आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने फलंदाजीचा निर्णय घेतला. “आम्ही पहिल्यांदा फलंदाी करू. मालिकेत 2-1 अशी स्थिती आहे. त्यामुळे मालिकेत कमबॅकसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. पहिल्या दोन तासात पिच कसं आहे याचा अंदाज येईल. पण या ट्रॅक फलंदाजी करणं योग्य राहील.” असं इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स म्हणाला. ” माझी गोलंदाजी चांगली होत आहे. पण त्यासाठी बराच वेळ झाला आहे. आम्ही संपूर्ण मालिकेत ज्या प्रकारे कार्य केले त्याबद्दल मी आनंदी आहे आणि अशाच आणखी काही गोष्टींची अपेक्षा करतो.”, असंही बेन स्टोक्स पुढे म्हणाला.

बेन स्टोक्सच्या निर्णयानंतर कर्णधार रोहित शर्माने आपलं मत व्यक्त केलं. “आम्हीही प्रथम फलंदाजी केली असती. खेळपट्टी थोडी कोरडी आणि काही ठिकाणी भेगा आहेत. इथल्या खेळपट्टीचं स्वरूप असंच आहे. शेवटचे दोन सामने आमच्यासाठी चांगले होते आणि आम्हाला त्याच पद्धतीने खेळावे लागेल. संघातील अनेक तरुण मुलांचा अभिमान आहे, त्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे आणि आव्हान स्वीकारले आहे. त्यांना त्यांच्या कौशल्यावर विश्वास आहे. या सामन्यातून आकाश दीप पदार्पण करतोय.”

रोहित शर्माला पहिल्यांदा फलंदाजी करायची होती. पण गोलंदाजांनी आपली चमक दाखवून दिली. खासकरून पदार्पणाच्या सामन्यात आकाशदीपने 3 गडी बाद केले. तसेच फिरकीपटू आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी पहिल्या सत्रात प्रत्येकी एक गडी बाद केला. त्यामुळे पहिल्या डावात इंग्लंडचा संघ बॅकफूटवर गेला आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.

'खोक्या'चा गेम ओव्हर, स‍तीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर
'खोक्या'चा गेम ओव्हर, स‍तीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर.
'कराड पेक्षा मोठा आका',धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरवर गुन्हा दाखल
'कराड पेक्षा मोठा आका',धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरवर गुन्हा दाखल.
सतीश भोसलेला अखेर बेड्या, पण 'खोक्या' प्रयागराजला पोहोचलाच कसा?
सतीश भोसलेला अखेर बेड्या, पण 'खोक्या' प्रयागराजला पोहोचलाच कसा?.
आईनेच 8 वर्षाच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून फेकलं, इतकंच नाहीतर...
आईनेच 8 वर्षाच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून फेकलं, इतकंच नाहीतर....
'तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही', रवींद्र धंगेकरांना कोणाचा इशारा?
'तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही', रवींद्र धंगेकरांना कोणाचा इशारा?.
मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट
मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट.
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण...
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण....
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्.
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल.
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी.