IND vs ENG : जो रूट जसप्रीत बुमराहचं फिक्स गिऱ्हाईक, आता केलं अशा पद्धतीने आऊट Watch Video

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या डावात टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं. तसेच 126 धावांची मजबूत आघाडी घेतली. पहिल्या डावात जसप्रीत बुमराहत हवी तशी हवा दिसली नाही. पण जो रूटला पुन्हा एकदा गिऱ्हाईक बनवलं.

IND vs ENG : जो रूट जसप्रीत बुमराहचं फिक्स गिऱ्हाईक, आता केलं अशा पद्धतीने आऊट Watch Video
Follow us
| Updated on: Feb 17, 2024 | 2:48 PM

मुंबई : भारत इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराहचा बोलबाला दिसला. दुसरा सामना जिंकण्यात जसप्रीत बुमराहचं मोलाचं योगदान होतं. पण तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहला फक्त एक गडी बाद करण्यात यश आलं. पण ही विकेट भारतासाठी महत्त्वाची होती. जो रूटला अवघ्या 18 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. मागच्या पाच डावात जसप्रीत बुमराहने तीनवेळा जो रूटला तंबूचा रस्ता दाखवला आहे.हैदराबादमधील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात जो रूटला एलबीडब्ल्यू केलं होतं. तर विशाखापट्टणम येथील पहिल्या डावात बुमराहन त्याला तंबूचा रस्ता दाखवला दाखवला होता. त्यामुळे आता जो रूटला स्वप्नातही जसप्रीत बुमराह दिसायला लागला असावं असं वाटत आहे. कारण जसप्रीत बुमराहसमोर जो रूटचा रेकॉर्ड एकदम खराब आहे. कसोटी क्रिकेटमध्ये दोन्ही खेळाडू 21 वेळा आमनेसामने आले. यात 9 वेळा तंबूचा रस्ता दाखवला आहे.

राजकोटमध्ये बुमराह भूत मानगुटीवरून काढण्याचा जो रूटने पुरेपूर प्रयत्न केला. रिव्हर्स लॅप शॉट्स खेळून बुमराहला बुचकळ्यात पाडण्याचा प्रयत्न होता. पण हीच रणनिती जो रुटसाठी बूमरँग ठरली. या शॉट्समध्ये जो रूट माहिर आहे. पण यावेळी बुमराहचा सामना करताना रणनिती फेल ठरली. सेकंड स्लिपला उभ्या असलेल्या यशस्वी जयस्वाल यांनी जबरदस्त झेल घेतला. जोर रुटचा झेल घेतला तेव्हा इंग्लंडच्या 224 धावा होत्या.

भारताकडून आतापर्यंत खेळलेल्या 5 डावात जो रूटने फक्त 70 धावा केल्या आहेत. जसप्रीत बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 29 डावात जो रूटला 13 वेळा बाद केलं आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने जो रुटला 14 वेळा तंबूचा रस्ता दाखवला आहे. हेझलवूडनेही जो रुटडला 42 डावात 13 वेळा बाद केलं आहे. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने 12 वेळा ही किमया साधली आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने 12 वेळा त्याला आऊट केलं आहे.

दुसरीकडे, तिसऱ्या दिवशी आर अश्विनची उणीव भासली नाही. उर्वरित चार गोलंदाजांनी आपली भूमिका चोखपणे बजावली आहे. आता दुसऱ्या डावात टीम इंडियाने मोठी धावसंख्या उभारली. तर गोलंदाजांच्या जोरावर विजय मिळवणं सोपं होईल.

बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.