Video : कुलदीप यादव याने जोस बटलरची अशी घेतली विकेट, नेटकरी म्हणाले ‘बॉल ऑफ द वर्ल्डकप’
IND vs ENG, World Cup 2023 : वनडे वर्ल्डकपमध्ये कुलदीप यादव याची चमकदार कामगिरी पाहायला मिळत आहे. मोक्याच्या क्षणी टीम इंडियाला विकेट मिळवून देण्याचं कामं कुलदीप करत आहे. बटलरची महत्त्वाची विकेट अशीच घेतली.
मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची जबरदस्त कामगिरी सुरु आहे. सलग सहा सामने जिंकत टीम इंडियाने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केलं आहे. दुसरीकडे, इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचे फलंदाज अपयशी ठरले असताना गोलंदाजांनी विजय खेचून आणला. टीम इंडियाने 50 षटकात 9 गडी बाद 229 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करणं तसं इंग्लंडला सोपं होतं. पण भारतीय गोलंदाजांनी तसं होऊ दिलं नाही. इंग्लंडला 129 धावांवर रोखत 100 धावांनी विजय मिळवून दिला. मोहम्मद शमीने 4, जसप्रीत बुमराहने 3, कुलदीप यादवने 2 आणि रवींद्र जडेजाने 1 गडी बाद केला. मात्र या सामन्यात कुलदीप यादवने घेतलेली जोस बटलरची विकेट क्रीडाप्रेमींच्या पसंतीस उतरली. जोस बटलरला बॉल ऑफ द वर्ल्डकप टाकल्याची स्तुती नेटकरी सोशल मीडियावर करत आहेत.
कुलदीप यादवने जोस बटलरचा त्रिफळा उडवला. कुलदीप यादवने टाकलेला चेंडू जोस बटलरला कळलाच नाही. त्यामुळे 10 धावा करून बटलरला तंबूत परतावं लागलं. एक वेळ अशी होती की कुलदीप यादवला संघातून डावलण्यात आलं होतं. मात्र कुलदीप यादवने आपल्या गोलंदाजीवर जबरदस्त कामं केलं. टीम इंडियात पुनरागमन करत महत्त्वाच्या क्षणी विकेट घेतल्या.
Frame kro lo…What a ball by Kuldeep Yadav.Buttler cleaned up.#kuldeep #KuldeepYadav #RohitSharma𓃵 #sky #INDvsENG #ICCMensCricketWorldCup2023 pic.twitter.com/DhJ6Obszb1
— Sparsh Mittal (@SparshM00273039) October 29, 2023
इंग्लंडचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. आता उरलेले तीन सामने फक्त औपचारिकता असणार आहे. पण एखाद्या संघाचं स्वप्न भंग करू शकतो. दुसरीकडे, भारताचा पुढचा सामना 2 नोव्हेंबरला श्रीलंकेशी होणार आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात 5 नोव्हेंबरला लढत होणार आहे. तर साखळी फेरीतील शेवटचा सामना नेदरलँडशी 12 नोव्हेंबरला होणार आहे.
दोन्ही संघांचे खेळाडू
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार/विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वुड