IND vs ENG : रोहित शर्माने सामन्यादरम्यान व्यक्त केली भीती, जर तसं झालं तर बसणार मोठा फटका Watch Video
भारत इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरु असून तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने जबरदस्त कमबॅक केलं. इंग्लंडला 319 धावांवर ऑलआऊट केलं. तसेच यशस्वी जयस्वालचं शतक आणि शुबमन गिलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने मोठी धावसंख्या उभारली आहे. पण सामन्यातील एक चूक चांगलीच महागात पडू शकते. ती भीती रोहित शर्माने सामना सुरु असतानाच व्यक्त केली.
मुंबई : भारत इंग्लंड यांच्यात तिसऱ्या कसोटीतील तिसरा दिवसाचा खेळ संपला. या सामन्यावर भारताने पकड मिळवली आहे. तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात इंग्लंडच्या खेळाडूंना झटपट तंबूत पाठवलं. तसेच पहिल्या डावात 126 धावांची आघाडी घेतली. पण हा सामना सुरु असताना कर्णधार रोहित शर्माने एक भीती व्यक्त केली होती. त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. काही अंशी ही भीती खरी ठरण्याची शक्यता आहे. कारण पुढच्या चार षटकातच इंग्लंड खेळ आटोपला. त्यामुळे सामना जिंकलो तरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेतील विजयी टक्केवारीवर फटका बसू शकतो. कारण टीम इंडियाने निर्धारित वेळेच्या 3 षटकं कमी टाकली होती. रोहित शर्माचं म्हणणं स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झालं आहे. “लवकर बॉल मागा यार..आपण तीन षटकं मागे आहोत. जर हे लोक ऑलआऊट झाले तर आपल्या तीन ओव्हरचं ते (पेनल्टी) लागेल.”, असं रोहित शर्मा म्हणाला. दुसरीकडे, रोहित शर्माची बोलण्याची शैली पाहून हसू आवरल्याशिवाय राहात नाही. कारण त्याने एक शब्द गाळल्याने सोशल मीडियावर विसरभोळ्या रोहितच्या चर्चा होत आहे. एकदा विराट कोहलीने त्याच्या विसरभोळेपणाबाबत मुलाखतीत सांगितलं होतं. कधी टॉस दरम्यान, तर प्लेइंग इलेव्हन सांगताना त्याची छबी समोर आली आहे.
68 वं षटक संपल्यानंतर रोहित शर्माने ही भीती व्यक्त केली. तेव्हा इंग्लंडच्या 7 गडी बाद 305 धावा होत्या. त्यानंतर पुढच्या तीन षटकात विकेट पडल्या. यात तीन षटकं कव्हर झाली असं दिसत नाही. त्यामुळे टीम इंडियाला सामना जिंकूनही विजयी टक्केवारीत 3 गुणांचा फटका बसू शकतो. स्लो ओव्हर रेटसाठी 3 षटकांसाठी 3 गुण कापले जातील. त्यामुळे दुसऱ्या स्थानावर झेप घेतली तरी विजयी टक्केवारीवरील परिणाम परवडणारा नाही. भविष्यात तीन चार गुणांमुळे अंतिम फेरीत स्थान मिळणं कठीण होईल.
Rohit said " Jaldi to mangao ball yaar, hum log teen over piche hai, agar ye log all out hogaye na to hmlog ko wo lagega 😭😭” pic.twitter.com/8Iqsfp8xuY
— Kuljot Singh (@KuljotSingh_4_5) February 17, 2024
टीम इंडियाला दक्षिण अफ्रिका दौऱ्यात स्लो ओव्हर रेटचा फटका बसला आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ठरलेल्या वेळेनुसार दोन षटकं कमी टाकली होती. तेव्हा 2 गुणांची पेनल्टी ठोकण्यात आली होती. त्यामुळे जिथे 54.77 टक्के गुण असायला हवे ते आता 52.77 टक्के आहेत. त्यामुळे इंग्लंड विरुद्धचा सामना जिंकलो आणि पेनल्टी लागली तर दोन गुण कापले जातील. आतापर्यंत पेनल्टीचा सर्वाधिक फटका हा इंग्लंडला बसला आहे. एकूण 19 गुण काले गेले आहेत. ऑस्ट्रेलियाचे 10, तर पाकिस्तानचे 2 गुण कापले गेले आहेत.