मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित अँड कंपनीने 106 धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर जसप्रीत बुमराह याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. बुमराहने 9 विकेट घेते इंग्लंडला दोन्ही डावात खिंडार पाडलं. टीम इंंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केलीये. या सामन्यानंतर टीम इंडियाचा आर अश्विन याच्यावर इंग्लंडच्या माजी खेळाडूने गंभीर आरोप केला आहे. आर. अश्विन हा चौथ्या विकेटसाठी वेडापिसा झाल्याचं म्हटलं आहे.
आर अश्विन याला पहिल्या डावात एकही विकेट मिळवता आली नाही. तर दुसऱ्या डावामध्ये त्याने तीन गडी आऊट केले पण त्याला चौथी विकेट काही घेता आली नाही. याचा फटका म्हणजे अश्विन त्याच्या 500 व्या विकेटपासून दूर राहिला. कसोटी क्रिकेटमध्ये अश्विनने 499 विकेट घेतल्या आहेत. याचाच धागा पकडत केवीन पीटरसन याने अश्विनबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
अश्विन त्याच्या विक्रमाचा पाठलाग करत होता त्यामुळे त्याला योग्य गोलंदाजी करता आली नाही. जेव्हा अश्विन त्याच्या 500 विकेट घेईल त्यानंतरच तो योग्य लाईनवर गोलंदाजी करेल, असं केवीन पीटरसन याने म्हटलं आहे. टॉम हार्टले हा कॅच आऊट झाल्यावर आर. अश्विनने 500 वी विकेट घेतली होती. मात्र डीआरएस घेतल्यावर हा निर्णय बदलला आणि तो विक्रम रचता रचता राहिला.
तिसरी कसोटी राजकोट येथे होणार असून या सामन्यात अश्विन आपली 500 विकेट पूर्ण घेण्यासाठी सर्व ताकद लावेल. पण एक मात्र नक्की आहे की तो विकेट घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. रविचंद्रन अश्विन हा इंग्लंड संघाच्या 97 विकेट घेत सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार