IND vs ENG : दुसऱ्या कसोटीत या खेळाडूंवर असेल नजर, अपेक्षित कामगिरी करून पॉइंट्समध्ये घालतील भर!
पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी विशाखापट्टणम येथे होते आहे. या सामन्यात कोणता संघ वरचढ ठरेल याची गणित आतापासूनच बांधली जात आहे. तसेच पॉइंट्सच्या गणितात कोणता खेळाडू कर्णधारपदासाठी योग्य ठरेल यासाठीही अंदाज बांधला जात आहे. स्वप्नपूर्ती करणाऱ्या खेळाडूंवर एक नजर टाकुयात.
मुंबई : इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया जबरदस्त दणका दिला. भारताला 28 धावांनी पराभूत करत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या सामन्यात कमबॅक करण्यासाठी भारताची धडपड असेल. तर इंग्लंड विजय मिळवून मालिकेत आपलं स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला दिग्गज खेळाडूंची उणीव भासेल. केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि विराट कोहली या सामन्यात नसतील. तर जेम्स अँडरसनची इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधील स्थान निश्चित झालं आहे. त्यामुळे स्वप्नपूर्ती करणारे 11 खेळाडू निवडणं एक चांगलंच आव्हान असणार आहे. कारण पाच दिवसांच्या खेळात कोणता खेळाडू कशी कामगिरी करेल सांगता येत नाही. असं असलं तरी पहिल्या कसोटीत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या आधारावर काही अंदाज बांधला जाऊ शकतात. त्यामुळे योग्य ते 11 खेळाडू निवडण्यास मदत होऊ शकते. प्लेइंग इलेव्हन, टॉस आणि पिच रिपोर्ट यात महत्त्वाची भूमिका बजावतील.
पिच रिपोर्ट
भारत इंग्लंड यांच्यातील दुसरा सामना विशाखापट्टणम येथील के वाय एस राजशेखर रेड्डी स्टेडियमवर होणार आहे. खेळपट्टी फलंदाजांसाठी पुरक असल्याचं मानलं जाते. त्यामुळे या सामन्यात फलंदाजांची बाजू वरचढ असेल. तर गोलंदाजांसाठी ही विकेट एकदम सपाट असेल. त्यामुळे जास्तीत जास्त धावा करण्याची जबाबदारी फलंदाजांवर असेल. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फिरकीची जादू दिसू शकते. सकाळच्या सत्रात वेगवान गोलंदाजांना स्विंगला मदत मिळेल.
शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना सूर गवसताना दिसत नाही. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. त्यात अष्टपैलू जडेजा नसल्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला घ्यायचं हा प्रश्न आहे. रजत पाटीदार आणि सरफराज खान यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. तर गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन यांच्या खांद्यावर असेल. नाणेफेकीचा कौल होण्यापूर्वी इंग्लंडने प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे.
प्लेइंग इलेव्हन: झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन
टीम इंडियाची संभाव्य इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, अक्षर पटेल, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज/वॉशिंग्टन सुंदर
संभाव्य ड्रीम 11 टीम
- कर्णधार- जो रूट
- उपकर्णधार- रोहित शर्मा
- विकेटकीपर- केएस भरत
- फलंदाज- शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, ओली पोप
- ऑलराउंडर- आर आश्विन, रेहान अहमद
- गोलंदाज- जेम्स अँडरसन, मार्क वुड, जसप्रीत बुमराह