IND vs ENG : अँडरसनच्या चेंडूवर बाद झाल्यानंतर शुबमन गिलने सांगितलं मनातलं, षटकार मारल्यानंतर काय होत होतं तेही बोलला
भारत इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने मजबूत पकड मिळवली आहे. पहिल्या डावात 255 धावांची आघाडी घेतली आहे. ही आघाडी मोडून काढून भारताला विजयासाठी धावा देणं खूपच कठीण असणार आहे. दुसरीकडे, भारताच्या टॉप पाच फलंदाजांनी 50 हून अधिक धावा केल्या. रोहित आणि शुबमनने शतक ठोकलं. यावेळी शुबमन गिलने अँडरसनच्या गोलंदाजीबाबत स्पष्टपणे बरंच काही सांगितलं.
मुंबई : भारत इंग्लंड यांच्यात पाचवा कसोटी सामना सुरु आहे. दुसऱ्या दिवशी भारताने 8 गडी गमवून 473 धावा केल्या आणि 255 धावांची मजबूत आघाडी मिळवली. दुसऱ्या दिवशी कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी शतकं ठोकली. बऱ्यात दिवसानंतर शुबमन गिलला पहिल्या डावात लय सापडली आहे. शुबमन गिलने 150 चेंडूंचा सामना करत 12 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 110 धावा केल्या. 73.33 च्या स्ट्राईक रेटने शुबमन गिलने शतक ठोकलं. शतकी खेळीत त्याने पाच उत्तुंग षटकार ठोकले. शोएब बशीरला 3, टॉम हार्टलेला 1, अँडरसनला 1 षटकार ठोकला. 34 वं षटक अँडरसन टाकत होता. त्याच्या दुसऱ्या चेंडूवर शुबमन गिल पुढे चालत आला आणि सरळ उंच षटकार मारला. त्यामुळे अँडरसन चांगलाच संतापला होता. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा शुबमन गिलला आजच्या खेळीबाबत बरंच काही विचारण्यात आलं. तेव्हा त्याने दिलखुलासपणे त्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली.
“मला अंदाज आला होता की चेंडूमध्ये फारसा बदल होत नाही. त्यामुळे सहज चेंडूवर जाणं सोपं होतं. मला त्याच्यावर दबाव आणायचा होता. पुढे जाऊन खेळताना मला बरं वाटतं होतं. पण नेमका तो चेंडू माझ्याकडू मिस झाला आणि बाद झालो. मला तो चेंडू नीटसा दिसला नाही. पुढे जाऊन खेळताना मला बरं वाटत होतं त्यामुळे मोठी खेळी करण्यात यशस्वी झालो.”, असं शुबमन गिलने सांगितलं. षटकार मारल्यानंतर अँडरसनची काय प्रतिक्रिया होती? असा प्रश्न विचारल्यानंतर शुबमन गिल म्हणाला, “मला वाटते त्या गप्पा आमच्या दोघांमध्येच ठेवल्या तर बरं होईल.”
SHOT OF THE MATCH. 🤯
– Shubman Gill smashed Anderson over the head for a six. pic.twitter.com/73BgI4QbyZ
— Johns. (@CricCrazyJohns) March 8, 2024
गिलचा अँडरसनसमोरचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत अँडरसनने गिलला दुसऱ्यांदा बाद केलं आहे. शुबमन गिलने अँडरसनच्या 166 चेंडूंचा समना केला आहे. यात सहावेळा बाद झाला आहे. तसेच 16 चौकार आणि एक षटकार मारला आहे. शुबमन गिलने या मालिकेतील दुसरं आणि करिअरमधलं चौथं शतक ठोकलं आहे. शुबमन गिलला या मालिकेत काही अंशी सूर गवसला आहे. या मालिकेत त्याने 452 धाव केल्या आहेत. गिलने दोन शतकं आणि 2 अर्धशतकं ठोकली आहेत. पाच सामन्यातील 9 डावात 712 धावा केल्या आहेत.