IND vs ENG | टीम इंडियातून आऊट झाल्यानंतर रवींद्र जडेजा कुठे गेला?

Ravindra Jadeja | रवींद्र जडेजा याने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियासाठी दमदार कामगिरी केली. मात्र दुखापतीने विकेट घेतल्याने जडेजा दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे.

IND vs ENG | टीम इंडियातून आऊट झाल्यानंतर रवींद्र जडेजा कुठे गेला?
Follow us
| Updated on: Jan 30, 2024 | 8:38 PM

मुंबई । रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाला पहिल्या कसोटी सामन्यात 190 धावांची आघाडी घेतल्यानंतरही इंग्लंड विरुद्ध पराभूत व्हावं लागलं. इंग्लंडने टीम इंडियावर मात करत 1-0 ने आघाडी घेतली. आता 5 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना हा शुक्रवार 2 ते मंगळवार 6 फेब्रुवारी दरम्यान विशाखापट्टणममध्ये पार पडणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाला 2 झटके लागले. बॅट्समन केएल राहुल आणि ऑलराउंडर रवींद्र जडेजा दुखातीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले. जडेजाला या दुखापतीमुळे फक्त दुसऱ्याच नाही, तर संपूर्ण मालिकेतून बाहेर पडावं लागू शकतं.

जडेजा पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात रन आऊट झाला. जडेजाला यानंतर त्रास जाणवला. जडेजाने पाय पकडला. जडेजाला हॅमस्ट्रिंग इंजरीचा त्रास आहे. त्यामुळे जडेजाला यातून पू्र्णपणे बरं होण्यासाठी फार वेळ लागू शकतो. त्यामुळे जडेजाला दुसऱ्या सामन्यासह उर्वरित मालिकेतून बाहेर पडावं लागू शकतं.

हे सुद्धा वाचा

जडेजा नक्की कुठे गेला?

रवींद्र जडेजा दुखापतीनंतर बंगळुरुतील एनसीए अर्थात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पोहचला आहे. आता जडेजा इथे दुखापतीतून पूर्णपणे बरा होईपर्यंत इथेच असेल. तसेच या कालावधीदरम्यान जडेजा फीट होण्यासाठी मेहनत घेईल. जडेजाने एनसीएत पोहचताच त्याने इंस्टा स्टोरी शेअर केली आहे. जडेजाने ‘पुढील काही दिवसांसाठीचं घर’ अशा कॅप्शनसह एनसीएचा फोटो शेअर केला आहे.

रवींद्र जडेजा याची इंस्टा पोस्ट

इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार.

कसोटी मालिकेसाठी इंग्लंड टीम | बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वुड, जॅक लीच, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन, डॅनियल लॉरेन्स आणि गस ऍटकिन्सन.

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.