IND vs ENG : हार्दिकच्या निशाण्यावर शिखर धवनचा रेकॉर्ड, फक्त इतक्याच धावांची गरज
Hardik Pandya Shikhar Dhawan : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी 20i मालिकेला 22 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. हार्दिक पंड्याला या मालिकेत शिखर धवन याचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे.
टीम इंडिया मायदेशात नववर्षात इंग्लंडविरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे. या मालिकेत एकूण 5 सामने खेळवण्यात येणार आहेत. मालिकेसाठी दोन्ही देशांकडून टीम जाहीर करण्यात आली आहे. जॉस बटलर इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर सूर्यकुमार यादव याच्याकडे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या मालिकेला बुधवारी 22 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. सलामीचा सामना हा कोलकातामधील ऐतिहासिक ईडन गार्डनमध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या याला या मालिकेत माजी सलामीवीर याचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.
शिखर धवनला पछाडण्याची संधी
हार्दिककडे शिखर धवनला मागे टाकण्याची संधी आहे. शिखर धवनने अवघ्या काही दिवसांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तर दुसऱ्या बाजूला हार्दिककडे शिखरचा टी 20i मधील धावांचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. हार्दिकला धवनचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी फक्त 60 धावांची गरज आहे.
हार्दिकने आतापर्यंत 85 टी 20i सामन्यांमध्ये 1 हजार 700 धावा केल्या आहेत. हार्दिकने या दरम्यान 4 अर्धशतकं झळकावली आहेत. हार्दिक टीम इंडियासाठी टी 20I क्रिकेटमधझ्ये सर्वाधिक धावा करणारा सहावा फलंदाज आहे. हार्दिकने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 60 धावा केल्यास शिखरला मागे टाकेल. शिखरने टी 20I क्रिकेटमध्ये 1 हजार 759 धावा केल्या आहेत.
टी 20i मध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
रोहित शर्मा : 4 हजार 231 धावा विराट कोहली : 4 हजार 188 धावा सूर्यकुमार यादव : 2 हजार 570 धावा केएल राहुल : 2 हजार 265 धावा शिखर धवन : 1 हजार 759 धावा हार्दिक पंड्या : 1 हजार 700 धावा
टी 20i मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, बुधवार 22 जानेवारी, इडन गार्डन
दुसरा सामना, शनिवार 25 जानेवारी, चेन्नई
तिसरा सामना, मंगळवार 28 जानेवारी, राजकोट
चौथा सामना, शुक्रवार 31 जानेवारी, पुणे
पाचवा सामना, रविवार 2 फेब्रुवारी, मुंबई
टी 20 सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कर्णधार) रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.
इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि वॉशिंगटन सुंदर.