IND vs ENG : सूर्यकुमार यादव कॅप्टन, 1 मालिका आणि 5 सामने, टीममध्ये कोण?
India vs England T20i Series Schedule : इंग्लंड भारत दौऱ्यात टीम इंडियाविरुद्ध टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. टी 20i मालिकेत उभयसंघात एकूण 5 सामने खेळवण्यात येणार आहेत.
टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिका खेळत आहे. टीम इंडिया त्यानंतर मायदेशात परतणार आहे. टीम इंडिया मायदेशात परतल्यानंतर इंग्लंड भारत दौऱ्यावर येणार आहे. इंग्लंड भारत दौऱ्यात टीम इंडियाविरुद्ध टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. टी 20i मालिका एकूण 5 सामन्यांची असणार आहे. तर त्यानंतर 3 मॅचची वनडे सीरिज होणार आहे. टी 20i मालिकेचं आयोजन हे 22 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलं आहे. तर त्यानंतर 6 ते 12 फेब्रुवारीपर्यंत एकदिवसीय मालिकेचा थरार क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
इंग्लंडने 22 डिसेंबर रोजी भारत दौऱ्यासाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर केला. जोस बटलर हा दोन्ही मालिकेत इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे आता बीसीसीआय निवड समिती भारतीय संघाची केव्हा घोषणा करणार? याकडे साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
सूर्या कॅप्टन आणखी कुणाला संधी?
सूर्यकुमार यादव हा टी 20I संघाचा नियमित कर्णधार आहे. त्यामुळे सूर्या टी20I सीरिजमध्ये नेतृत्व करणार असल्याचं निश्चित आहे. मात्र निवड समिती त्या व्यतिरिक्त कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी देणार? कुणाचं कमबॅक होणार आणि कुणाला डच्चू मिळणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. भारतीय संघाची येत्या आठवड्यात घोषणा होण्याची शक्यता आहे.
भारत-इंग्लंड टी 20i मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, बुधवार 22 जानेवारी, इडन गार्डन
दुसरा सामना, शनिवार 25 जानेवारी, चेन्नई
तिसरा सामना, मंगळवार 28 जानेवारी, राजकोट
चौथा सामना, शुक्रवार 31 जानेवारी, पुणे
पाचवा सामना, रविवार 2 फेब्रुवारी, मुंबई
टी 20 सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कर्णधार) रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.
इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारताचा संभाव्य संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, आवेश खान आणि यश दयाल.