IND vs ENG : बांगलादेशविरुद्ध 258 च्या स्ट्राईक रेटने धावा करणाऱ्या फलंदाजाला डच्चू, कोण आहे तो?
India vs England T20i Series : टीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.
टीम इंडियाची इंग्लंड विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध भिडणार आहे. भारतीय संघात या मालिकेसाठी आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हिशोबाने प्रमुख खेळाडूंना विश्रांत दिली आहे. तर युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. मात्र रियान पराग याला संधी दिलेली नाही. रियान पराग अखेरीस बांगलादेशविरुद्ध टी 20i मालिका खेळला होता. तेव्हा रियानने दोन्ही सामन्यांमध्ये 250 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतरही आता इंग्लंडविरुद्ध रियानला संधी मिळाली नाही. त्यामुळे रियानला कोणत्या कारणामुळे वगळण्यात आलं? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
रियालना खांद्याच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संधी देण्यात आली नव्हती. रियान दुखापतीतून पूर्णपणे फिट झालाय की नाही, याबाबत अधिकृत माहिती नाही. मात्र रियानने एक्स अकाउंटवरुन सरावाचे काही व्हीडिओ पोस्ट केले होते. मात्र रियान अजून खेळण्याइतपत फिट झाला नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे रियानला देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतही खेळता आलं नाही. त्यामुळेच रियानची इंग्लंड विरुद्ध निवड केली नाही, असं म्हटलं जात आहे.
भारत-इंग्लंड टी 20i मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, बुधवार 22 जानेवारी, इडन गार्डन
दुसरा सामना, शनिवार 25 जानेवारी, चेन्नई
तिसरा सामना, मंगळवार 28 जानेवारी, राजकोट
चौथा सामना, शुक्रवार 31 जानेवारी, पुणे
पाचवा सामना, रविवार 2 फेब्रुवारी, मुंबई
रियानची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
दरम्यान रियानने आतापर्यंत 9 टी 20i आणि 1 वनडे सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. रियानने टी 20i क्रिकेटमध्ये 106 धावा केल्या आहेत. तर एकमेव वनडेत 15 धावा केल्या आहेत. तसेच रियानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 7 विकेट्स घेतल्या आहेत.
टी 20 सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कर्णधार) रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.
इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि वॉशिंगटन सुंदर.