IND vs ENG : टीम इंडियामध्ये 22 वर्षाच्या खेळाडूची इंग्लंडविरूद्धच्या मालिकेसाठी निवड, इतकी का होतेय चर्चा?
IND vs ENG Test Series : टीम इंडिया आणि इंग्लंडमधील कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने संघ जाहीर केला आहे. या संघामध्ये अवघ्या 22 वर्षांच्या युवा खेळाडूची निवड झाली आहे. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.
मुंबई : इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार तर जसप्रीत बुमराह संघाचा उपकर्णधारपद असणार आहे. आफ्रिका दौऱ्यावरील संघच जवळपास आहे फक्त काही बदल झाले आहेत. तीन ते चार खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे. सर्वांसाठी धक्कादायक म्हणजे ध्रुव जुरेल या युवा खेळाडूची विकेटकीपर म्हणून निवड झाली आहे. क्रिकेट वर्तुळामध्ये याची जोरदार चर्चा आहे.
कोण आहे हा ध्रुव जुरेल?
टीम इंडियाकडून अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये ध्रुव जुरेल याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी होती. इमर्जिंग आशिया कपसाठी टीम इंडियामध्ये त्याची निवड झाली आणि त्यानंतर भारत अ संघासोबत साऊथ आफ्रिकेचा दौरा त्याने केला होता. साऊथ आफ्रिकेच्या अ संघाविरूद्ध त्याने शतक झळकवलं होतं.
ध्रुव जुरेल याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 15 सामन्यात 790 धावा केल्या आहेत. यामध्ये एका शतकासह पाच अर्धशतकांचा समावेश आहे. 10 लिस्ट-ए सामन्यांमध्ये 189 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्येही जुरेल याने 2023 च्या मोसमात डेब्यू केलेला होता. आयपीएलमध्ये जुरेल याने राजस्थान रॉयल्स संघाकडून 13 सामन्यांमध्ये 172 च्या स्ट्राईक रेटने 152 धावा केल्या आहेत.
बीसीसीआयने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी या संघाची घोषणा केली आहे. मुकेश कुमार आणि आवेश खान यांना स्थान मिळालं असून प्रसिद्ध कृष्णा याची निवड करण्याती आली नाही. आफ्रिका दौऱ्यावर दोन्ही कसोटी सामन्यात खराब कामगिरी केली होती. पहिल्या सामन्यातील प्रदर्शन चांगलं नाही राहिलं तरीसुद्धा रोहित शर्मा याने कृष्णाला दुसऱ्या सामन्यात संधी दिली होती. मात्र त्याला आपली छाप पाडता आली नाही.
पहिल्या-दुसऱ्या टेस्टसाठी स्क्वॉड
रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरैल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.