मुंबई | भारतीय क्रिकेट संघाने दुसरा कसोटी सामना चौथ्याच दिवशी जिंकला. टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात इंग्लंडचा 106 धावांनी धुव्वा उडवला. टीम इंडियाने या विजयासह पहिल्या पराभवाचा वचपा घेतला. इतकंच नाही, तर टीम इंडियाने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरीही केली. आता मालिकेतील तिसरा सामना हा 15 ते 19 फेब्रुवारी दरम्यान राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. उर्वरित 3 सामन्यांसााठी भारतीय संघाची घोषणा केव्हा होणार, याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
दुसऱ्या सामन्याच्या निकालानंतर क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे उर्वरित सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा होतेय,याकडे लागून राहिलं आहे. तसेच विराट कोहली याच्या कमबॅककडेही चाहत्यांची नजर आहे. या साऱ्या प्रश्नांची उत्तर येत्या काही तासातच मिळण्याची शक्यता आहे. तिसऱ्या कसोटी सामन्याला अजून 9 दिवसांचा कालावधी बाकी आहे.
इंग्लंड विरुद्धच्या शेवटच्या 3 सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा ही 7 किंवा 8 फेब्रुवारी रोजी केली जाऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येत्या काही तासात बीसीसीआय निवड समिती खेळाडूंची नावं जाहीर करणार आहे. बुमराहला वर्कलोड पाहता तिसऱ्या सामन्यातून विश्रांती दिली जाऊ शकते. बुमराहने पहिल्या 2 सामन्यात निर्णायक भूमिका बजावली. त्यामुळे बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय महागात पडू शकतो. याशिवाय आता निवड समिती कुणाला संधी देते आणि कुणाला बाहेरचा रस्ता दाखवणार हे देखील तितकंच महत्त्वाचा ठरणार आहे.
लवकरच टीम इंडियाची घोषणा
Indian squad for the 3rd Test is likely to be announced tomorrow or February 8th. [Sports Tak] pic.twitter.com/xoGHrFz3de
— Johns. (@CricCrazyJohns) February 6, 2024
टेस्ट सीरिजसाठी इंग्लंड टीम | बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन, मार्क वुड, ऑली रॉबिन्सन, डॅनियल लॉरेन्स आणि गस ऍटकिन्सन.
टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, श्रीकर भारत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, सरफराज खान, आवेश खान , सौरभ कुमार आणि ध्रुव जुरेल.