IND vs ENG | विराट-श्रेयसनंतर आता हा खेळाडू मालिकेतून बाहेर, दुखापतीमुळे पत्ता कट
India vs England Test Series | इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून टीम इंडियाचे दोघे म्हणजे विराट कोहली आणि श्रेयस अय्यर हे बाहेर पडले आहेत. त्यानंतर आता मोठी अपडेट समोर आली आहे.
मुंबई | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरी मॅच राजकोटमध्ये 15 फेब्रुवारीपासून खेळवण्यात येणार आहे. मालिकेतील पहिला सामना हा हैदराबादमध्ये पार पडला. इंग्लंडने रंगतदार झालेला सामना जिंकून विजयी सलामी दिली. त्यानंतर टीम इंडियाने विशाखापट्टणममध्ये जोरदार कमबॅक करत विजय मिळवला आणि मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. आता तिसरा सामना जिंकून कोणती टीम मालिकेत आघाडी घेते, याकडे क्रिकेच चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र तिसऱ्या सामन्याआधी टीमला मोठा झटका लागला आहे.
हा खेळाडू मालिकेतून बाहेर
इंग्लंड क्रिकेट टीमला तिसऱ्या सामन्याला काही दिवस शिल्लक असतानाच मोठा धक्का लागला आहे. इंग्लंडचा स्टार स्पिनर जॅक लीच याला दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. जॅक लीच याला टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. जॅक लीच याला याच दुखापतीमुळे विशाखापट्टणममध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळता आलं नाही.
जॅक लीच दुखापतीतून सावरून लवकरच उपलब्ध होईल, अशी आशा इंग्लंडच्या क्रिकेट चाहत्यांना होती. मात्र आता जॅक लीच याला उर्वरित मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. जॅक लीच याने पहिल्या सामन्यात बॉल अडवण्यासाठी फिल्डिंग दरम्यान डाईव्ह मारली होती. लीचला या दरम्यान दुखापत झाली होती. लीचच्या गुडघ्याला दुखापत झाली होती.
शेवटच्या 3 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा (फिटनेसवर अवलंबून).
इंग्लंड क्रिकेट टीम | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन, मार्क वुड, ऑली रॉबिन्सन, डॅनियल लॉरेन्स आणि गस ऍटकिन्सन.