मुंबई | बेन स्टोक्स याच्या नेतृत्वात इंग्लंड क्रिकेट टीम भारत दौऱ्यावर आली आहे. इंग्लंड टीम इंडिया विरुद्ध रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिल सामना हा 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. रोहित शर्मा-विराट कोहली या अनुभवी खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशातच टीममध्ये युवा ऑलराउंडर खेळाडूची एन्ट्री झाली आहे.
कसोटी मालिकेआधी इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूक याने वैयक्तिक कारणामुळे या 5 सामन्यांच्या मालिकेतून माघार घेतली. त्यामुळे इंग्लंडला मोठा झटका लागला. आता त्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने हॅरी ब्रूकच्या जागी बदली खेळाडूची घोषणा केली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ऑलराउंडरला संधी आहे. इंग्लंड क्रिकटने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे.
डॅन लॉरेन्स याचा हॅरी ब्रूक याच्या जागी टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी समावेश करण्यात आला आहे. डॅनने आतापर्यंत 11 कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचं नेतृत्व केलं आहे. डॅनने या 11 सामन्यांमधील 21 डावात 1 अर्धशतकासह 551 धावा केल्या आहेत. तसेच 7 डावात 3 विकेट्स घेतल्या आहेत. हॅरी ब्रूक याने माघार घेतल्याने डॅनला जवळपास 2 वर्षांनी इंग्लंड टीममध्ये एन्ट्री मिळाली आहे.
डॅनने श्रीलंके विरुद्ध 14 जानेवारी 2021 रोजी कसोटी पदार्पण केलं होतं. तर वेस्ट इंडिज विरुद्ध 24 मार्च 2022 रोजी अखेरचा कसोटी सामना खेळला होता. तेव्हापासून डॅन टीममधून बाहेर होता. मात्र अखेर डॅनला हॅरीने माघार घेतल्याने संधी मिळाली आहे. त्यामुळे आता डॅनला टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील प्लेईंग ईलेव्हनमध्ये संधी देतात की बाहेर बसवतात, याकडे इंग्लंडच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
डॅन 24 तासात इंग्लंड टीममध्ये दाखल होणार
Surrey’s Dan Lawrence to join the England Men’s Test squad in the next 24 hours.
🇮🇳 #INDvENG 🏴 pic.twitter.com/DepT9duRnZ
— England Cricket (@englandcricket) January 21, 2024
टेस्ट सीरिजसाठी इंग्लंड क्रिकेट टीम | बेन स्टोक्स (कॅप्टन), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), शोएब बशीर, झॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फोक्स, टॉम हार्टली, जॅक लीच, ऑली पोप, डॅन लॉरेन्स, रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.
पहिल्या 2 कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जड़ेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.