मुंबई | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड भारत दौऱ्यावर आली आहे. इंग्लंडने या दौऱ्याची सुरुवात शानदार केलीय. इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियावर 28 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यानंतर आता मालिकेतील दुसरा सामना हा 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान विशाखापट्टणम येथे पार पडणार आहे. त्याआधी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
बीसीसीआय निवड समितीने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यांसाठीच स्क्वाड जाहीर केला. दुसऱ्या सामन्याला अवघे काही तासच शिल्लक आहे. अशात उर्वरित 3 सामन्यांसाठी संघाची घोषणा केव्हा होणार, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. याबाबत मोठी माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित आगरकर यांच्या नेतृत्वात बीसीसीआय निवड समितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत अनेक खेळाडूंच्या कामगिरीनुसार कुणाला संधी द्यायची आणि कुणाला डावलायचं याबाबत चर्चा होईल. त्यानंतर अखेर उर्वरित 3 सामन्यांसाठी संघ जाहीर केला जाऊ शकतो.
बीसीसीआयने पहिल्या 2 सामन्यांसाठी आधीच संघ जाहीर केला. मात्र पहिल्या सामन्या दरम्यान केएल राहुल आणि रवींद्र जडेजा या दोघांना दुखापत झाली. त्यामुळे हे दोघे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले आहेत. त्यांच्या जागी टीम इंडियात तिघांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सरफराज खान याला पहिल्यांदा संधी देण्यात आली आहे. तर सौरभ कुमार आणि ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर या दोघांचाही समावेश करण्यात आलेला आहे.
उर्वरित कसोटी मालिकेतून शुबमन गिल याला बाहेरचा रस्ता दाखवायला हवा, अशी मागणी क्रिकेट चाहत्यांची आहे. शुबमन गिल याने पहिल्या सामन्यात सपशेल निराशा केली. त्यामुळे त्याच्या जागी दुसऱ्या फलंदाजाचा प्लेईंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात यावा, असं म्हटलं जात आहे. आता निवड समिती काय निर्णय घेते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
30 जानेवारीला टीम इंडियाची घोषणा?
Indian team for the last 3 Tests is likely to be announced tomorrow. [Sports Tak] pic.twitter.com/qDLYN5eRgM
— Johns. (@CricCrazyJohns) January 29, 2024
कसोटी मालिकेसाठी इंग्लंड टीम | बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वुड, जॅक लीच, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन, डॅनियल लॉरेन्स आणि गस ऍटकिन्सन.
दुसऱ्या कसोटीसाठी अशी आहे टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार.