IND vs ENG : मुंबई इंडियन्सने तिसऱ्या कसोटीतील प्लेइंग इलेव्हनमधील पाच नावं आणली समोर

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये गुरुवारी सुरु होणार आहे. मालिकेत आघाडी घेण्यासाठी या सामन्यातील विजय दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवरही याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे भारतीय कोणती प्लेइंग इलेव्हन उतरवेल याची उत्सुकता आहे. असं असताना मुंबई इंडियन्सने ट्वीट करत पाच नावं घोषित केली आहेत.

IND vs ENG : मुंबई इंडियन्सने तिसऱ्या कसोटीतील प्लेइंग इलेव्हनमधील पाच नावं आणली समोर
IND vs ENG : मुंबई इंडियन्सने तिसऱ्या कसोटीतील प्लेइंग इलेव्हनमधील पाच नावं आणली समोर
Follow us
| Updated on: Feb 14, 2024 | 7:54 PM

मुंबई : भारत इंग्लंड दोन्ही संघ तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज आहेत. या सामन्यातील विजय दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. मालिकेतील आघाडी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर त्याचा फरक पडणार आहे. इंग्लंडने तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वात कोणता संघ मैदानात उतरणार याची उत्सुकता आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात केएल राहुल आणि रवींद्र जडेजा खेळले नव्हते. आता रवींद्र जडेजाने कमबॅक केलं आहे. तर केएल राहुल खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये काय बदल असेल? कोण डेब्यु करणार याची उत्सुकता आहे. असं असताना मुंबई इंडियन्सने पाच खेळाडूंची नावं जाहीर केली आहे. तसेच उर्वरित सहा खेळाडूंसाठी मतं मागवली आहेत. त्या पोस्टखाली नेटकऱ्यांनी उर्वरित सहा खेळाडूंची नावं सांगितली आहे. आता रोहित शर्मा कोणत्या खेळाडूंसह मैदानात उतरतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मुंबई इंडियन्स ट्विटरवर एक पोस्ट टाकली आहे. त्यात पाच नावं घोषित केली आहेत. संघातील दिग्गज खेळाडू असल्याने खेळणार हे नक्की आहे. पण रवींद्र जडेजाचं नाव पाच खेळाडूंमध्ये नाही. त्यामुळे अजून त्याचं जर तरवर अवलंबून असल्याचं दिसत आहेत. रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल, आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांची नावं जाहीर केली आहेत. हे पाच खेळाडू संघात असतील असा अंदाज मुंबई इंडियन्सने जाहीर केला आहे.

तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन : बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.

भारताची संभाव्य इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज.

टीम इंडिया : यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, श्रीकर भारत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, सरफराज खान , वॉशिंग्टन सुंदर , ध्रुव जुरेल , आकाश दीप.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.