IND vs ENG | खरं बोलायलाही जिगर लागतं, द्विशतक मारल्यावर जयस्वाल म्हणाला, ‘या दोन खेळाडूंकडून प्रेरणा घेतली, अन्…

Yashasvi Jaiswal : टीम इंडियाचा उभारता तारा असलेला जिगारबाज खेळाडू यशस्वी जयस्वाल याने द्विशतक करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले. सामना संपल्यावर जयस्वालने प्रामाणिकपणे मोठा खुलासा केला आहे.

IND vs ENG | खरं बोलायलाही जिगर लागतं, द्विशतक मारल्यावर जयस्वाल म्हणाला,  'या दोन खेळाडूंकडून प्रेरणा घेतली, अन्...
Follow us
| Updated on: Feb 18, 2024 | 10:30 PM

राजकोट | टीम इंडिया आणि इंग्लंडमधील तिसरा कसोटी सामना रोहित अँड कंपनीने चौथ्याच दिवशी खिशात घातला. टीम इंडियाने इंग्लंड संघाला 434 धावांनी पराभूत करत कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय मिळवला. या विजयामध्ये टीम इंडियाचा उभारता तारा असलेल्या यशस्वी जयस्वाल याने नाबाद 214 धावांची खेळी केली. या कसोटीमध्ये पहिल्या डावामध्ये 33-3 अशी संघाची अवस्था झाली होती. मात्र सांघिक कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने चौथ्याच दिवशी विजय मिळवला. रवींद्र जडेजा याला सामनावीर पुरस्कार देत गौरवण्यात आलं. सामना संपल्यावर द्विशतकवीर यशस्वी जयस्वाल याने दोन खेळडूंची नाव घेत त्यांना पाहून आपण प्रेरणा घेतल्याचं सांगितलं.

काय म्हणाला यशस्वी जयस्वाल?

ज्यावेळी पहिल्या डावात रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा बॅटींग करत होते. तेव्हा मी त्या दोघांकडे पाहून प्रेरणा घेतली आणि तशा पद्धतीने दुसऱ्या डावात खेळ केला. डग आऊटमध्ये बसलो होतो तेव्हाच मी कसोटी क्रिकेटसाठी 100 टक्के योगदान द्यायचं ठरवलं. जेव्हा-जेव्हा मला कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळते तेव्हा माझे लक्ष्य सर्वोत्तम कामगिरी करण्याचे असते. चांगल्या फॉर्मचा फायदा घेणे आणि त्याचे मोठ्या खेळीत रूपांतर करणं महत्त्वाचं असल्याचं यशस्वी जयस्वाल म्हणाला.

यशस्वीने जे सांगितलं, की रोहित आणि जडेजा यांना खेळताना पाहून प्रेरणा घेतली. तिसऱ्या कसोटीमध्ये रोहित शर्माने पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पहिल्या तीन विकेट लवकर गेल्या. टीमची धावसंख्या 33-3 अशी झाली होती, तेव्हा टीम मॅनेजमेंनटने जडेजाला पाच नंबरला खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी रोहित आणि जडेजा यांनी मोठी भागीदारी केली. त्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या कमाल कामगिरीच्या इंग्लंडला बॅकफूटला ढकललं.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.