IND vs IRE, Bhuvneshwar Kumar : पहिल्याच षटकात भुवनेश्वरचा विश्वविक्रम, दिग्गजांना टाकलं मागे, जाणून घ्या…

या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार भारतीय संघाचा उपकर्णधार आहे. त्याने आयर्लंडच्या डावाच्या पहिल्याच षटकात इतिहास रचला. यामुळे  भुवनेश्वरची देखील खेळी दमदार ठरली. भुवनेश्वरनं विश्वविक्रम केल्यानं ही चर्चा रंगली होती.

IND vs IRE, Bhuvneshwar Kumar : पहिल्याच षटकात भुवनेश्वरचा विश्वविक्रम, दिग्गजांना टाकलं मागे, जाणून घ्या...
भुवनेश्वर कुमारImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 8:19 AM

नवी दिल्ली : टी-20 (T-20) T20 मालिकेतील दोन सामन्यांच्या पहिल्या सामन्यात भारतानं आयर्लंडचा (IRE) 7 गडी राखून पराभव केला. भारतानं (IND) काल दीपक हुडा, इशान आणि हार्दिकच्या तुफान खेळीवर सामना जिंकला. पाऊस असल्यानं जवळपास अडीच तासानंतर सामना सुरू होण्यास उशीर झाला. यामुळे पंचांनी षटके कापून सामना 12-12 षटकांचा केला. सामना सुरु झाल्यानंतर पहिले फलंदाजी करताना आयर्लंडनं 12 षटकांत 4 गडी गमावून 108 धावा केल्या. हॅरीनं शानदार फलंदाजी करताना नाबाद 64 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघानं 9.2 षटकांत तीन गडी गमावून 111 धावा करून सामना जिंकला. दीपक हुडा 29 चेंडूत 47 धावा करून नाबाद राहिला आणि दिनेश कार्तिकने 4 चेंडूत 5 धावा केल्या. या विजयासह टीम इंडियानं आयर्लंडविरुद्ध 1-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. दरम्यान, यामध्ये भुवनेश्वर कुमारनं विक्रम केलाय. तोही विश्वविक्रम केलाय. तो काय आहे, ते जाणून घेऊया…

या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार भारतीय संघाचा उपकर्णधार आहे. त्याने आयर्लंडच्या डावाच्या पहिल्याच षटकात इतिहास रचला. यामुळे  भुवनेश्वरची देखील जास्तीत जास्त चर्चा होती. भुवनेश्वरनं विश्वविक्रम केल्यानं ही चर्चा रंगली होती.

पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स

भुवनेश्वर कुमार टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पॉवरप्ले ओव्हरमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. त्यानं आयर्लंडविरुद्धच्या सामन्याच्या पहिल्याच षटकात विरोधी कर्णधार अँड्र्यू बालबर्नीला बोल्ड केलं. अँड्र्यू बालबर्नीला दोन चेंडूंच्या खेळीत एकही धाव करता आली नाही. T20 सामन्यातील पॉवरप्लेमध्ये भुवीची ही 34वी विकेट होती. पॉवरप्ले ओव्हरमध्ये तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.

हे सुद्धा वाचा

बीसीसीआयचं ट्विट

दोन दिग्गजांना मागे टाकलंय

  1. भुवनेश्वर कुमारने पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत दोन खेळाडूंना मागे टाकलं
  2. वेस्ट इंडिजचा लेगस्पिनर सॅम्युअल बद्रीनं टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या पॉवरप्लेमध्ये 33 विकेट घेतल्या
  3. त्याच्याशिवाय न्यूझीलंडच्या टीम साऊदीने पॉवरप्लेमध्ये 33 विकेट्स घेतल्या आहेत
  4. बांगलादेशच्या शाकिब अल हसनने 27 तर ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडच्या नावावर 26 विकेट्स आहेत

आयर्लंडने पहिल्या दोन षटकात दोन गडी गमावल्याने भारताला 109 धावांचे लक्ष्य दिलं होतं . चौथ्या षटकात संघाला तिसरा धक्का बसला. यानंतरही त्यांनी भारतासमोर विजयासाठी 109 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या हॅरी टेक्टरनं 33 चेंडूत 64 धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या खेळीत 6 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. भारताकडून भुवनेश्वर कुमारशिवाय हार्दिक पांड्या, आवेश खान आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.