IND vs NED Live Streaming | टीम इंडिया-नेदरलँड्स आमनेसामने, वर्ल्ड कप 2023 साखळी फेरीतील शेवटचा सामना
India vs Netherlands Live Streaming | टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये सुरुवातीपासून ते आतापर्यंत एकूण 8 पैकी 8 सामने जिंकले आहेत. तर नेदरलँड्सला 8 पैकी 2 सामन्यात यश आलं आहे.
बंगळुरु | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आहे. वर्ल्ड कप 2023 सेमी फायनलसाठी 4 टीम निश्चित झाल्या आहेत. टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 4 संघांनी सेमी फायनलसाठी क्वालिफाय केलंय. तर या 13 व्या वर्ल्ड कपमधील साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स आमनेसामने असणार आहेत. टीम इंडिया आणि नेदरलँड्स या दोन्ही संघांचाही साखळी फेरीतील नववा आणि अखेरचा सामना आहे. टीम इंडियाने सेमी फायनलसाठी क्वालिफाय केलंय. तर नेदरलँड्स वर्ल्ड कपमधून बाहेर पडलीय. त्यामुळे तसा हा सामना म्हणजे औपचारिकताच आहे. मात्र टीम इंडियाचा हा सामना जिंकून सलग 9 सामने जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. तर नेदरलँड्स विजय मिळवून शेवट गोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स सामना केव्हा?
टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स सामना रविवारी 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स सामना कुठे?
टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स सामना हा बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?
टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. तर डीडी स्पोर्ट्सवर सामना फुकटात पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स सामना मोबाईलवर फुकटात पाहण्यासाठी डिज्नी पल्स हॉटस्टार एप डाऊनलोड करावा लागेल.
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, प्रसिध कृष्णा, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
वर्ल्ड कप 2023 साठी नेदरलँड्स टीम | स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, विक्रम सिंग, तेजा निदामानुरु, पॉल व्हॅन मीकेरेन, कॉलिन अकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, नोहा क्रोस, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद आणि सायब्रँड एंजेलब्रेक्ट.