IND vs NED : टीम इंडियाने नेदरलँडला विजयासाठी 411 धावांचं आव्हान देत रचला इतिहास

IND vs NED : पहिल्या ओव्हरपासून फटाके फोडल्यासारखी बॅटींग करणाऱ्या भारतीय संघाच्या खेळाडूंनी शेवटपर्यंत तसाच खेळ केला. के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी दमदार शतके करत भारताला 400 धावांचा टप्पा पार करून दिला.

IND vs NED : टीम इंडियाने नेदरलँडला विजयासाठी 411 धावांचं आव्हान देत रचला इतिहास
Follow us
| Updated on: Nov 12, 2023 | 6:14 PM

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारत आणि नेदरलँडमधील सामन्यात भारताने प्रथम फंलदाजी करताना 410-4 धावांचा डोंगर उभारला आहे. केल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 400 धावांचा टप्पा पूर्ण केला. नेदरलँड संघाला विजयासाठी 411 धावांंचं आव्हान दिलं आहे. भारताची वर्ल्ड कमधील हा प्रथम फलंदाजी करतानाची दुसरी मोठी सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी 2007 साली बर्मुडा या देशाविरूद्ध भारताने 413 धावा केल्या होत्या.

भारताचा डाव

भारतीय संघाची सुरूवात एकदम झकास झाली होती, शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांनी 100 धावांचा सलामी दिली होती.  रोहित 61 धावांवर आऊट झाला तर शुबमन गिल 51 धावा करून माघारी परतला, त्यानंतर विराट कोहलीनेही अर्धशतक केलं होतं मात्र त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आलं. विराटला 52 धावांवर असताना व्हॅन डर मर्वेने त्याला बोल्ड केलं.

विराट आऊट झाल्यावर खेळायला आलेल्या श्रेयस अय्यर आणि के.एल. राहुल यांनी शतकी खेळी केली. श्रेयस अय्यरने 94 बॉलमध्ये 128 धावा केल्या यामध्ये त्याने 10 चौकार आणि 5  षटकार मारले. तर के. एल. राहुल याने 64 बॉलमध्ये 102 धावा केल्या यामध्ये त्याने 11 चौकार आणि 4 षटकार मारले. के.एल. राहुल हा वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाकडून सर्वात वेगवान शतक करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

दरम्यान, भारताकडून सर्वच खेळाडूंनी 50 पेक्षा जास्त धावा केल्या. फक्त शेवटला एक चेंडू मिळालेल्या प्रत्येक खेळाडूने अर्धशतकी खेळी केली. आता भारतीय गोलंदाज नेदरलँड संघाला किती धावांच्या आत गुंडाळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (w), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

नेदरलँड्स (प्लेइंग इलेव्हन): वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडोड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, स्कॉट एडवर्ड्स (C/W), बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.