IND vs NED | रोहित शर्मा याचं अर्धशतकांचं ‘शतक’, नेदरलँड्स विरुद्ध जोरदार बॅटिंग
Rohit Sharma | रोहित शर्मा याने आतापर्यंत वर्ल्ड कप 2023 मध्ये आतापर्यंत जोरदार बॅटिंग केलीय. रोहितने नेदरलँड्स विरुद्ध अर्धशतक ठोकत मोठा कारनामा केला आहे. जाणून घ्या.
बंगळुरु | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स आमनेसामने आहेत. टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने जोरदार बॅटिंग केली. या दोघांनी टीम इंडियाचा चांगली सुरुवात मिळवून दिली. शुबमन गिल याने या भागीदारीदरम्यान अर्धशतक ठोकलं. मात्र त्यानंतर शुबमन गिल आऊट झाला. शुबमन गिलने 51 धावा केल्या.
शुबमननंतर विराट कोहली मैदानात आला. शुबमननंतर हिटमॅन रोहितनेही आपलं अर्धशतक पूर्ण केलं. रोहितने चौकार ठोकून 44 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. रोहितच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे 55 वं अर्धशतक ठरलं. रोहितने या अर्धशतकासह कीर्तीमान केला. रोहितचं हे आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 100 वं अर्धशतकं ठरलं.
रोहितची कोणत्या फॉर्मेटमध्ये किती अर्धशतकं?
रोहितने आतापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये 55 अर्धशतकं ठोकली आहेत. तर हिटमॅनने टेस्टमध्ये 16 आणि टी 20 क्रिकेटमध्ये 29 अर्धशतकं झळकावली आहेत. रोहितला 100 व्या आंतरराष्ट्रीय अर्धशतकानंतर शतक पूर्ण करण्याची नामी संधी होती. मात्र रोहितने नेहमीप्रमाणे बिंधास्तपणे फटकेबाजी केली. रोहितने शतकाचा विचार न करता बॅटने हाणामारी करायला लागला. या फटेबाजीच्या नादात रोहित आऊट झाला.
रोहितचं अर्धशतकांचं शतक
Make that half-century number 💯 in international cricket for Rohit Sharma 👏👏
He powers #TeamIndia to yet another superb start!#CWC23 | #MenInBlue | #INDvNED pic.twitter.com/3tCVPUJ91K
— BCCI (@BCCI) November 12, 2023
रोहितने नेदरलँड्स विरुद्ध 54 बॉलमध्ये 8 चौकार-2 षटकारांच्या मदतीने आणि 112.96 च्या स्ट्राईक रेटने 61 धावांची खेळी केली. रोहितला बास द लीडे याने आऊट केलं. रोहित आऊट झाल्याने टीम इंडियाची स्थिती 17.4 ओव्हरमध्ये 2 बाद 129 अशी झाली.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडोड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन.