IND vs NED | विराट कोहली याला नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्यात वर्ल्ड रेकॉर्डची संधी

India vs Netherlands | विराट कोहली याने आतापर्यंत आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये बॅटिंगने शानदार कामगिरी केली आहे. आता विराटला नेदरलँड्स विरुद्ध विश्व विक्रम करण्याची संधी आहे.

IND vs NED | विराट कोहली याला नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्यात वर्ल्ड रेकॉर्डची संधी
विराट कोहली याने वर्ल्ड साखळी फेरीत सर्वाधिक धावा केल्या. विराटने 9 सामन्यात 594 धावा केल्या.
Follow us
| Updated on: Nov 12, 2023 | 2:05 PM

बंगळुरु | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील सेमी फायनलसाठीचे 4 संघ निश्चित झाले आहेत. टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने सेमी फायनलसाठी क्वालिफाय केलंय. तर उर्वरित संघांचं वर्ल्ड कपमधून पॅकअप झालंय. या 13 व्या वर्ल्ड कपमध्ये आज 12 नोव्हेंबरला टीम इंडिया, नेदरलँड्स आणि आणि साखळी फेरीतील अखेरचा सामना होत आहे. या सामन्याचं आयोजन हे बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला.

टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल गेला. कॅप्टन रोहित शर्मा याने बॅटिंगचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी टीम इंडिया आणि नेदरलँड्स या दोन्ही संघांनी प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी आपल्या त्याच प्लेईंग ईलेव्हनवर विश्वास दाखवला आहे. टीम इंडिया आधीच सेमी फायनलमध्ये पोहचली आहे. तर नेदरलँड्सचं वर्ल्ड कपमधून पॅकअप झालंय.

त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना औपचारिकता आहे. मात्र टीम इंडियाचा हा सामना जिंकून वर्ल्ड कपमध्ये सलग 9 सामने जिंकण्याचा विक्रम मानस असणार आहे. तर नेदरलँड्स विजयाने शेवट करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. हा सामना टीम इंडियाच्या विराट कोहली याच्यासाठी फार महत्त्वाचा आहे.

विराटसाठी मोठी संधी

एम चिन्नास्वामी स्टेडियम विराटचं दुसरं होम ग्राउंड आहे. विराट आयपीएलमध्ये आरसीबीसाठी खेळतो. आरसीबीचं हे होम ग्राउंड आहे. विराटने या मैदानात टीम इंडिया आणि आरसीबीसाठी खोऱ्याने धावा केल्या आहेत. याच मैदानात आता विराटला वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे. विराटला सर्वाधिक वनडे शतकांचा सचिन तेंडुलकर याचा विश्व विक्रम ब्रेक करण्याची संधी आहे.

विराट त्या वर्ल्ड रेकॉर्डपासून फक्त 1 शतक दूर आहे. आता सचिन आणि विराट या दोघांच्या नावावर वनडेमध्ये संयुक्तरित्या 49 शतकं आहेत. त्यामुळे विराट आपल्या घरच्या मैदानात वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करुन क्रिकेट चाहत्यांना दिवाळी गिफ्ट देणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडोड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.