टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आज 18 ऑक्टोबर रोजी पहिल्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. न्यूझीलंडचा तिसऱ्या दिवशी पहिला डाव हा 402 धावांवर आटोपला आहे. न्यूझीलंडने यासह टीम इंडिया विरुद्ध 356 धावांची मजबूत आघाडी घेतली आहे.न्यूझीलंडने टीम इंडियाला 46 धावांवर गुंडाळल्यानंतर 400 पार मजल मारली. रचीन रवींद्र याने कसोटी कारकीर्दीतील एकूण दुसरं तर घराबाहेरील पहिलं शतक झळकावलं. रवींद्र बाद होताच न्यूझीलंडचा डाव आटोपला. रवींद्रला टीम साऊथीने याने अप्रतिम साथ दिली. या जोडीने आठव्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी केली. त्यामुळे टीम इंडिया विरुद्ध मोठी आघाडी घेता आली. तर दोघांव्यतिरिक्त डेव्हॉन कॉनव्हे याने 91 धावांचं योगदान दिलं. तर टीम इंडियाकडून 5 जणांनी गोलदांजांनी बॉलिंग केली. त्या सर्वांनी किमान 1-1 विकेट घेतलीच.
न्यूझीलंडने टीम इंडियाच्या 46 धावांच्या प्रत्युत्तरात तिसऱ्या दिवसाचा खेळाला 3 बाद 180 धावांपासून सुरुवात केली.न्यूझीलंडकडे 134 धावांची आघाडी होती. रचीन रवींद्र आणि डॅरेल मिचेल या जोडीने खेळ सुरु केला. टीम इंडियाने दिवसाच्या खेळाला अप्रतिम सुरुवात केली. टीम इंडियाने न्यूझीलंडला झटपट 4 झटके दिले. डॅरेल मिचेल 18, टॉम ब्लंडेल 5, ग्लेन फिलीप्स 14 आणि मॅट हॅन्री 8 धावांवर आऊट झाला. त्यामुळे न्यूझीलंडची स्थिती 233 वर 7 अशी झाली. टीम इंडियाने यासह सामन्यात कमबॅक केलं होतं. मात्र रचीन आणि टीम साऊथीने पु्न्हा एकदा न्यूझीलंडला कमबॅक करुन दिलं. या दोघांनी आठव्या विकेटसाठी 132 बॉलमध्ये 137 रन्सची पार्टनरशीप केली.
मोहम्मद सिराजने ही सेट जोडी फोडली. सिराजने टीम साऊथीला आऊट केलं. साऊथीने 73 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 5 फोरसह 65 रन्स केल्या. एझाज पटेलला कुलदीप यादवने 4 धावांवर एलबीडब्ल्यू केलं. तर रचीन रवींद्र सर्वात शेवटी आऊट झाला. रचीनने 157 चेंडूत 4 षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने 134 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा या जोडीने प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी 1-1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
न्यूझीलंड 400 पार
Innings Break!
New Zealand all out for 402.
3⃣ wickets each for @imjadeja & @imkuldeep18
2⃣ wickets for @mdsirajofficial
1⃣ wicket each for vice-captain @Jaspritbumrah93 & @ashwinravi99Scorecard ▶️ https://t.co/8qhNBrrtDF#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/CWyn6Zbq0x
— BCCI (@BCCI) October 18, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टीम साउथी, एजाझ पटेल आणि विल्यम ओरूर्के.