INDvsNZ : टीम इंडियाला मोठा झटका, आयसीसीकडून मोठी कारवाई
टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 12 धावांनी विजय मिळवला होता. यासह भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
मुंबई : टीम इंडियाने न्यूझीलंडचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात कॅप्टन रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 12 धावांनी विजय मिळवला. भारताने न्यूझीलंडला विजयासाठी 350 धावांचे आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाने न्यूझीलंडला 337 धावांवर ऑलआऊट केलं. रोहितसेनेने यासह विजयी सुरुवात केली. मात्र त्यानंतरही टीम इंडियाला मोठा झटका बसलाय. आयसीसीने टीम इंडियावर मोठी कारवाई केली आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात नियमांचं उल्लंघन केलं. त्यामुळे आयसीसीने सामन्यातील एकूण मानधनाच्या 60 टक्के इतकी रक्कम दंड म्हणून सुनावला आहे.
आयसीसीच्या नियमांनुसार, ठराविक वेळेत अपेक्षित ओव्हर टाकणं जाणं अपेक्षित असतं. मात्र टीम इंडियाने त्या गतीने ओव्हर टाकता आल्या नाहीत. त्यामुळे आयसीसीने हा कारवाईचा बडगा उगारला.
पहिला एकदिवसीय सामना हा हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात मॅचरेफरी जवागल श्रीनाथ यांनी टीम इंडियाने निर्धारित वेळेत 3 ओव्हर कमी टाकल्याचं म्हटलं. त्यामुळे टीम इंडियाकडून आयसीसीच्या आचार संहितेच्या अनुच्छेद 2.22 चं उल्लंघन झालं. हा अनुच्छेद स्लो ओव्हर रेट उल्लंघनाशी संबंधित आहे. यानुसार, प्रत्येकी 1 ओव्हरसाठी एकूण सामन्यातील मानधनाच्या 20 टक्के दंड आकारला जातो. त्यानुसार 3 ओव्हरसाठी 60 टक्के दंड सुनावला आहे.
कर्णधार रोहित शर्माने आपल्याकडून झालेली चुकी मान्य केली आहे. त्यामुळे आयसीसीकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. फिल्ड अंपायर अनिल चौधरी आणि नितीन मेनन, थर्ड अंपायर केएन अनंतपद्मनाभन आणि फोर्थ अंपायर जयरामन मदनगोपाल या चौकडीने हा आरोप लगावला होता.
दरम्यान टीम इंडिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालायची संधी आहे. या मालिकेतील दुसरा सामना हा शनिवारी 21 जानेवारीला रायपूरमध्ये खेळवण्यात येणार आहे.
न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, रजत पाटीदार, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक.
टीम न्यूझीलंड
टॉम लॅथम (कॅप्टन/विकेटकीपर), फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, जेकब डफी, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमन आणि हेन्री शिपली.
वनडे सीरिजचं वेळापत्रक
पहिला सामना, 18 जानेवारी, हैदराबाद
दुसरा सामना, 21 जानेवारी, रायपूर
तिसरा सामना, 24 जानेवारी, इंदूर