INDvsNZ, 1st Odi | टीम इंडिया ‘या’ बॉलरमुळे हरता हरता वाचली, कॅप्टन रोहितची लाज राखली
शुबमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 350 धावांचं आव्हान दिलं. त्यामुळे टीम इंडियाचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र ब्रेसवेलने टीम इंडियाला जोरदार ठोकलं. टीम इंडिया हरते की काय अशी स्थिती निर्माण झाली.
हैदराबाद : टीम इंडियाने न्यूझीलंडवर पहिल्या एकदिवसीय सामन्यात 12 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 350 धावांचे आव्हान दिले होते. मात्र यानंतरही टीम इंडियाला विजयासाठी शेवटच्या ओव्हरची प्रतिक्षा करावी लागली. टीम इंडियाने न्यूझीलंडच्या 6 फलंदाजांना झटपट आऊट केलं. मात्र त्यानंतर न्यूझीलंडच्या शेपटीने टीम इंडियाला चांगंलंच झुंजवलं. शेवटी शेवटी सामना रंगतदार स्थितीत पोहचला. टीम इंडियावर पराभवाची टांगती तलवार होती. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजाने निर्णायक क्षणी विकेट घेतली. या गोलंदाजांने एकमेव विकेट घेत टीम इंडियाला विजयी केली. इतकंच नाही, तर कॅप्टन रोहित शर्माची लाज राखली. तसंच शुबमन गिल यांचं द्विशतक व्यर्थ जाऊ दिलं नाही.
न्यूझीलंडचा फलंदाज मायकल ब्रेसवेल टीम इंडियाच्या गोलंदाजांना चांगलाच चोपत होता. मैदानात चौफेर फटकेबाजी करत होता. मात्र रोहितने ब्रह्मास्त्र काढलं आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
शुबमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 350 धावांचं आव्हान दिलं. त्यामुळे टीम इंडियाचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र ब्रेसवेलने टीम इंडियाला जोरदार ठोकलं. टीम इंडिया हरते की काय अशी स्थिती निर्माण झाली. न्यूझीलंडला विजयासाठी शेवटच्या म्हणजेच 50 व्या ओव्हरमध्ये विजयासाठी 20 धावांची गरज होती.
रोहितने शेवटची आणि निर्णायक ओव्हर दिली ती ‘पालघर एक्सप्रेस’ शार्दुल ठाकूर याला. शार्दुलने कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला. शार्दुलने शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा दिल्या. तसेच ब्रेसवेलचा काटा काढला अर्थात त्याला एलबीडबल्यू आऊट केलं. ब्रेसवेल 140 धावांवर आऊट झाला. यासह टीम इंडियाने सामना 12 धावांनी जिंकला.
टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. या विजयाचं श्रेय शार्दुलला दिलं जात आहे. शार्दुलने नाजूक स्थितीत ओव्हर टाकत विकेट घेत अवघ्या 7 धावा दिल्या आणि टीम इंडियाला जिंकवलं. शार्दुलने या सामन्यात एकूण 2 विकेट्स घेतल्या.
दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडसाठी ‘करो या मरो’
दरम्यान पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव झाला आहे. त्यामुळे न्यूझीलंडसाठी 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना हा ‘करो या मरो’ असा असणार आहे. न्यूझीलंडला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही परिस्थिती सामना जिंकावा लागेल. मालिकेतील दुसरा सामना शनिवारी 21 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडियाची प्लेइंग 11
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकुर, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन
फिन एलन, डेवन कॉनवे, हेनरी निकल्स, डेरिल मिचेल, टॉम लैथम (कॅप्टन), ग्लेन फिलिप्स, माइकल ब्रेसवेल, मिचेल सैंटनर, लॉकी फर्ग्यूसन, शिप्ले आणि टिकनर.