Shubman Gill : शुबमन गिल याचा डबल धमाका, ठोकलं वनडेत द्विशतक
शुबमन गिल याने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धमाका केलाय. शुबमनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकण्याचा कारमान केला आहे.
हैदराबाद : टीम इंडियाचा सलामी फलंदाज शुबमन गिल याने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात धमाका केलाय. शुबमन गिलने एकदिवसीय सामन्यात द्विशतक ठोकण्याचा पराक्रम केलाय. गिलने अवघ्या 145 बॉलमध्ये द्विशतक पूर्ण केलं. गिल यासह एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारा एकूण पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. शुबमनने वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी द्विशतक ठोकलंय. शुबमनने या द्विशतकात 8 गगनचुंबी सिक्स आणि 19 चौकार ठोकले.
शुबमन पाचवा भारतीय
एकदिवसीय क्रिकेट इतिहासात सचिन तेंडुलकर याने सर्वात आधी द्विशतक ठोकण्याची अशक्य कामिगरी केली. त्यानंतर रोहित शर्माने तब्बल 3 वेळा द्विशतक ठोकलं. वीरेंद्र सेहवागनेही हा कारनामा केलाय. तर अवघ्या काही दिवसांपूर्वीच इशान किशन यानेही डबल सेंच्युरी ठोकली होती.
शुबमन गिल डबल सेंच्युरी
?.?.?.
?????? ??????? ???
Take a bow, @ShubmanGill ??#INDvNZ pic.twitter.com/wwvQslGTxb
— BCCI (@BCCI) January 18, 2023
न्यूझीलंडला विजयासाठी 350 धावांचं आव्हान
टीम इंडियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 349 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 350 धावांचं आव्हान मिळालं आहे. टीम इंडियाकडून शुबमन गिलने सर्वाधिक 208 धावांची खेळी केली. शुबमनने या खेळीत 19 चौकार आणि 9 गगनचुंबी सिक्स ठोकलं.
शुबमनशिवाय टीम इंडियाच्या फलंदाजांना विशेष कामगिरी करता आली नाही. शुबमन व्यतिरिक्त टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्माने 34, सूर्यकुमार यादव याने 31, हार्दिक पांड्या याने 28 तर वॉशिंग्टन सुंदरने 12 धावा केल्या. या व्यतिरिक्त टीम इंडियाच्या इतर फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही.
वेगवान द्विशतकाचा विक्रम कुणाच्या नावावर
एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान द्विशतक करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड हा इशान किशनच्या नावावर आहे. इशानने अवघ्या 126 बॉलमध्ये द्विशतक पूर्ण केलं होतं. इशानने विंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल याला पछाडत हा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. गिलने138 बॉलमध्ये ही कामगिरी केली होती.
टीम इंडियाची प्लेइंग 11
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकुर, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन
फिन एलन, डेवन कॉनवे, हेनरी निकल्स, डेरिल मिचेल, टॉम लैथम (कॅप्टन), ग्लेन फिलिप्स, माइकल ब्रेसवेल, मिचेल सैंटनर, लॉकी फर्ग्यूसन, शिप्ले आणि टिकनर.