टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दुखापत झाली. त्यानंतर पंत चौथ्या दिवशी बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा त्याने एक मोठा कारनामा केला आहे. पंतला दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया झालेल्या पायाला बॉल लागल्याने दुखापत झाली होती. त्यामुळे पंतला मैदानाबाहेर जावं लागलं होतं. त्यामुळे पंतच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेल याने विकेटकीपिंग केली. तर पंत चौथ्या दिवशी सर्फराजसह बॅटिंगसाठी आला. पंतने सर्फराजला अप्रतिम साथ देत कडक बॅटिंग केली. पंतने पावसामुळे खेळ थांबला तोवर 56 बॉलमध्ये 53 धावांची नाबाद खेळी केली. पंतने या खेळीत 3 सिक्स लगावले आणि त्याने यासह टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांचा एक रेकॉर्ड उद्धवस्त केला.
पंतने बंगळुरु कसोटीतील दुसऱ्या डावात फलंदाजी करताना 3 षटकार खेचले आहेत. पंत यासह कसोटीत टीम इंडियाकडून सर्वाधिक सिक्स लगावणारा सहावा फलंदाज ठरला आहे. पंतने यासह कपिल देव यांना मागेट कालं आहे. देव यांनी 131 कसोटींमध्ये 61 सिक्स लगावले होते. तर पंतने 36 व्या सामन्यातच ही कामिगिरी करुन दाखवली आहे. टीम इंडियाकडून टेस्टमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम हा वीरेंद्र सेहवाग याच्या नावावर आहे. सेहवागने 103 सामन्यांमध्ये 90 षटकार लगावले आहेत.
कसोटीत सर्वाधिक षटकार लगावणारे भारतीय
वीरेंद्र सहवाग – 90
रोहित शर्मा – 88
महेंद्रसिंह धोनी – 78
सचिन तेंडुलकर – 69
रवींद्र जडेजा – 66
ऋषभ पंत – 62
कपिल देव -61
ऋषभ पंतचं 12 वं कसोटी अर्धशतक
12th Test FIFTY for Rishabh Pant! 👌 👌
This has been an entertaining knock 👏 👏
Live ▶️ https://t.co/8qhNBrrtDF#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ipZSWtZjUk
— BCCI (@BCCI) October 19, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टीम साउथी, एजाझ पटेल आणि विल्यम ओरूर्के.