IND vs NZ : 6 चौकार आणि 3 षटकार, सर्फराज खानचा अर्धशतकी तडाखा, विराटसोबत जोरदार फटकेबाजी

Sarfaraz Khan Fifty : टीम इंडियाची सलामी जोडी माघारी परतल्यानंतर सर्फराजने विराट कोहलीच्या मदतीने टीम इंडियाचा डाव सावरला. तसेच फटकेबाजी करत सर्फराजने चौथं अर्धशतक झळकावलं.

IND vs NZ : 6 चौकार आणि 3 षटकार, सर्फराज खानचा अर्धशतकी तडाखा, विराटसोबत जोरदार फटकेबाजी
sarfaraz khan fifty
Follow us
| Updated on: Oct 18, 2024 | 4:45 PM

टीम इंडियाने न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात नाक कापलं. रोहितसेनेचा पहिला डाव हा अवघ्या 46 धावांवर आटोपला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडने रचीन रवींद्र आणि टीम साऊथी या जोडीने 8 व्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडने या जोरावर पहिल्या डावात ऑलआऊट 402 मजल मारली. त्यामुळे न्यूझीलंडने टीम इंडिया विरुद्ध पहिल्या डावात 356 धावांची भक्कम आघाडी घेतली. त्यानंतर प्रत्युत्तरात टीम इंडियाने आश्वासक सुरुवात केली.

कॅप्टन रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी 72 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र त्यानंतर यशस्वी मोठा फटका मारण्याच्या नादात स्टंपिंग आऊट झाला. यशस्वीने 32 धावा केल्या. यशस्वीनंतर काही धावा करुन रोहितही माघारी परतला. रोहितने 52 धावा केल्या. मात्र त्यानंतर सर्फराज खान आणि विराट कोहली या दोघांनी न्यूझीलंडवर वरचढ होऊन फटकेबाजी केली. एका बाजूने विराटने हल्लाबोल केला तर दुसऱ्या बाजूने सर्फराजने टॉप गिअरमध्ये फटकेबाजी केली. सर्फराजने संधी मिळेल तसे फटके मारले आणि एकेरी-दुहेरी धावा घेत अर्धशतक पूर्ण केलं.

सर्फराजने अवघ्या 42 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने आणि 119.05 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक ठोकलं. सर्फराजच्या कसोटी कारकीर्दीतील हे चौथं अर्धशतक ठरलं. टीम इंडियाला आता सर्फराजकडून शतकी खेळी अपेक्षित आहे. तसेच टीम इंडियाची स्थिती पाहता विराट आणि सर्फराज या जोडीकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा आहे. आता विराट-सर्फराज न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा कसा सामना करतात? याकडे साऱ्यांचंच लक्ष असणार आहे.

सर्फराज खानचं वनडे स्टाईल अर्धशतक

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टीम साउथी, एजाझ पटेल आणि विल्यम ओरूर्के.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.