INDvsNZ 2nd Odi, Live Streaming: जाणून घ्या कधी कुठे पाहता येणार दुसरा एकदिवसीय सामना

टीम इंडिया 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकाही जिंकण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असेल.

INDvsNZ 2nd Odi, Live Streaming: जाणून घ्या कधी कुठे पाहता येणार दुसरा एकदिवसीय सामना
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 9:02 PM

रायपूर : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला पराभूत करत विजयी सलामी दिली. टीम इंडियाचा पहिल्या सामन्यात 349 धावा करुनही रडत रडत 12 धावांनी विजय झाला. न्यूझीलंडच्या मायकल ब्रेसवलने झुंजार शतक ठोकत टीम इंडियाला विजयाासाठी शेवटच्या ओव्हरपर्यंत झुंजवलं. असं असलं तरी टीम इंडियाने विजय मिळवला खरा. या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा न्यूझीलंडला एकतर्फी फरकाने पराभूत करत मालिका जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे.

टीम इंडियाने याआधी श्रीलंकेचा एकदिवसीय मालिकेत 3-0 असा एकतर्फी धुव्वा उडवला होता. टीम इंडियाचा आता असाच प्रयत्न हा न्यूझीलंड विरुद्ध असणार आहे. मात्र या सामन्यात टीम इंडियाला आपल्या गोलंदाजांमध्ये बदल करावा लागेल. कारण गेल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी खूप धावा लुटवल्या होत्या. न्यूझीलंडने कडवी झुंज दिली होती. न्यूझीलंड भारत दौऱ्यावर आपल्या प्रमुख 3 खेळाडूंशिवाय आली आहे. कॅप्टन केन विलियमनस, टीम साऊथी आणि ट्रेन्ट बोल्ट या तिघांचा या मालिकेत समावेश नाही.

दुसरा सामना केव्हा खेळवण्यात येणार?

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा सामना हा 21 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

या दुसऱ्या सामन्याचं आयोजन हे रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.

सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

या दुसऱ्या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 1 वाजता टॉस होणार.

लाईव्ह सामना कुठे पाहता येणार?

क्रिकेट चाहत्यांना हा लाईव्ह सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. तसेच हॉटस्टारवरही पाहता येईल.

न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, रजत पाटीदार, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक.

टीम न्यूझीलंड

टॉम लॅथम (कॅप्टन/विकेटकीपर), फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, जेकब डफी, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमन आणि हेन्री शिपली.

वनडे सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना, 18 जानेवारी, हैदराबाद

दुसरा सामना, 21 जानेवारी, रायपूर

तिसरा सामना, 24 जानेवारी, इंदूर

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.