IND vs NZ : टीम इंडिया दुसऱ्या वनडेत इतिहास रचणार?

रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह स्टेडियममध्ये टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

IND vs NZ : टीम इंडिया दुसऱ्या वनडेत इतिहास रचणार?
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 11:37 PM

रायपूर : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना 21 जानेवारीला रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या दुसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार सराव केला आहे. तसेच टीम इंडिया या दुसऱ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 द्विशतकवीर फलंदाजांना खेळवणार आहे. स्वत: कॅप्टन रोहित शर्मा, इशान किशन आणि शुबमन गिल मैदानात दिसतील. तसेच टीम इंडिया दुसऱ्या वनडेत इतिहास रचणारी आणि वनडे क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी पहिलीच टीम ठरेल.

रोहित शर्माने एकिदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 3 वेळा द्विशतक ठोकण्याचा कारनामा केला आहे. याशिवाय इशान किशनने बांगलादेश विरुद्ध 2022 मध्ये द्विशतक केलं. त्यानंतर आता शुबमन गिल याने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात शानदार द्विशतक ठोकलं. यासह अनेक विक्रम आपल्या नावे केले.

क्रिकेट विश्वात आतापर्यंत कोणत्याही टीमने प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 द्विशतकवीरांना एकत्र खेळवलं असेल. त्यामुळे रोहित, इशान आणि शुबमन दुसऱ्या सामन्यात खेळले तर एक खास रेकॉर्डची नोंद होईल.

हे सुद्धा वाचा

पहिल्या सामन्यातील विजयानंतर कॅप्टन रोहित प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करणार नाही. मात्र पहिल्या सामन्यात मोहम्मद सिराजचा अपवाद वगळता सर्व गोलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे रोहित गोलंदाजांमध्ये बदल करु शकतो. तसेच रोहितचा दुसरा सामना जिंकून मालिकाही जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र समोर न्यूझीलंडचं आव्हान आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघात काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया संभावित प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर किंवा उमरान मलिक.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.