IND vs NZ : रोहित डक, टीम इंडिया 243 धावांनी पिछाडीवर, पहिल्या दिवशी एकूण 11 विकेट्स, वॉशिंग्टन सुंदर चमकला
India vs New Zealand 2nd Test Day 1 Highlights : दुसऱ्या कसोटीतील पहिल्या 2 सत्रात सामना बरोबरीत होता. मात्र तिसऱ्या सत्रात टीम इंडियाने आघाडी घेत न्यूझीलंडला गुंडाळलं. मात्र टीम इंडियानेही रोहित शर्माची मोठी विकेट गमावली.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवशी एकूण 11 विकेट्स गेल्या. तसेच 275 धावा करण्यात आल्या. न्यूझीलंडने पहिल्याच दिवशी ऑलआऊट 259 धावा केल्या. त्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने 1 विकेट गमावून 16 धावा केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडिया दिवसअखेर 243 धावांनी पिछाडीवर आहे. आता टीम इंडियाचे फलंदाज दुसऱ्या दिवशी कशी कामगिरी करतात? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. आपण पहिल्या दिवसाच्या खेळात काय काय झालं हे सविस्तर जाणून घेऊयात.
वॉशिंग्टन आणि अश्विनची ‘सुंदर’ बॉलिंग
टॉस जिंकून बॅटिंगसाठी आलेल्या न्यूझीलंडला टीम इंडियाची आर अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर ही जोडीच उरुन पुरली. अश्विन आणि सुंदन या दोघांनी न्यूझीलंडचा करेक्ट कार्यक्रम केला. आर अश्विनने न्यूझीलंडला पहिले 3 झटके दिले. त्यानंतर एकट्या वॉशिंग्टन सुंदरने न्यूझीलंडचा बाजार उठवला. वॉशिंग्टनने शेवटच्या 7 विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडकडून ओपनर डेव्हॉन कॉनव्हे याने 141 बॉलमध्ये 76 रन्स केल्या. तर रचीन रवींद्न 65 धावांचं योगदान दिलं. तर वॉशिंग्टनने इतरांना हात खोलण्यााआधीच मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. टीम इंडियाने न्यूझीलंडला 62 धावांच्या मोबदल्यात 6 झटके दिले आणि 79.1 ओव्हरमध्ये ऑलआऊट केलं.
टीम इंडियाची संथ सुरुवात
त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि कॅप्टन रोहित शर्मा ही टीम इंडियाची सलामी जोडी मैदानात आली. दोघांनी संथ सुरुवात केली. मात्र रोहितने घोर निराशा केली. रोहितला भोपळाही फोडता आला नाही. रोहितला टीम साऊथीने तिसऱ्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर क्लिन बोल्ड केलं. साऊथीची रोहितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आऊट करण्याची ही 14 वी वेळ ठरली. रोहितनंतर शुलबमन गिल मैदानात आला. शुबमन आणि यशस्वी या दोघांनी खेळ संपेपर्यंत संयमी खेळी केली. भारताने 11 षटकांमध्ये 1 विकेट गमावून 16 धावा केल्या आहेत. शुबमन गिल 10 आणि यशस्वी 6 धावांवर नाबाद आहेत.
दुसऱ्या दिवशी काय होणार?
Stumps on Day 1 of the 2nd Test.#TeamIndia trail by 243 runs in the first innings.
Scorecard – https://t.co/3vf9Bwzgcd… #INDvNZ @IDFCFIRSTBank pic.twitter.com/diCyEeghM4
— BCCI (@BCCI) October 24, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, आकाश दीप आणि जसप्रीत बुमराह
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.