IND vs NZ : वॉशिंग्टन सुंदरकडून बुक्कीत टेंगूळ, न्यूझीलंडचा कार्यक्रम, किवी 259 वर ऑलआऊट

Washignton Sundar 7 Wickets : वॉशिंग्टन सुंदर आणि आर अश्विन या फिरकी जोडीने न्यूझीलंडला पहिल्या डावात 259 धावांवर गुंडाळलंय. वॉशिंग्टने 7 तर अश्विनने 3 विकेट्स घेतल्या.

IND vs NZ : वॉशिंग्टन सुंदरकडून बुक्कीत टेंगूळ, न्यूझीलंडचा कार्यक्रम, किवी 259 वर ऑलआऊट
rishabh pant washington sundar and rohit sharmaImage Credit source: Bcci x Account
Follow us
| Updated on: Oct 24, 2024 | 4:31 PM

1 हजार 330 दिवसांनी कसोटी संघात परतलेल्या वॉशिंग्टन सुंदर याने टीम मॅनजमेंटचा विश्वास सार्थ ठरवला आहे. वॉशिंग्टन सुंदर याने न्यूझीलंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्याच दिवशी धमाका केला आहे. वॉशिंग्टन सुंदर याने एकट्याने 7 विकेट्स घेत न्यूझीलंडला 259 धावावंर ऑलआऊट करण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे. तर दुसर्‍या बाजूला आर अश्विन याने सुंदरला अप्रतिम साथ दिली. अशाप्रकारे टीम इंडियाच्या या फिरकी जोडीनेच पाहुण्या किवींचा करेक्ट कार्यक्रम केला. आता भारतीय गोलंदाजांनंतर फलंदाजांवर मोठी आघाडी मिळवून देण्याची जबाबदारी असणार आहे.

टीम इंडियाचं कमबॅक

न्यूझीलंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. न्यूझीलंड आणि टीम इंडियाने दोन्ही सत्रात बरोबरीचा खेळ केला. मात्र तिसऱ्या सत्रात टीम इंडियाने कमबॅक करत बाजी मारली आणि न्यूझीलंडला गुंडाळलं. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनव्हे आणि रचीन रवींद्र या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. दोघांनी अर्धशतकी खेळी केली. कॉन्वहेने सर्वाधिक 76 तर रचीनने 65 धावांचं योगदान दिलं. दोघांव्यतिरिक्त मिचेल सँटनर याने 33 धावा केल्या. डॅरेल मिचेल आणि विल यंग या दोघांनी प्रत्येकी 18 धावा जोडल्या.कॅप्टन टॉम लॅथमने 15 रन्स केल्या. तर इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह, आकाश दीप, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि आर अश्विन या 5 जणांनी बॉलिंग केली. मात्र वॉशिंग्टन सुंदर आणि अश्विन या दोघांनीच न्यूझीलंडचा बाजार उठवला. अश्विनने पहिल्या 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर एकट्या वॉशिंग्टनने उर्वरित 7 विकेट्स घेत न्यूजीलंडचं पॅकअप केलं.

न्यूझीलंडचं 259 धावांवर पॅकअप

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, आकाश दीप आणि जसप्रीत बुमराह

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.