IND vs NZ : टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ स्थिती, न्यूझीलंडला मालिका विजयाची संधी, कोण ठरणार यशस्वी?
India vs New Zealand 2nd Test : टॉम लॅथम याच्या नेतृत्वात न्यूझीलंडने टीम इंडियाचा पहिल्या कसोटी सामन्यात धुव्वा उडवला. न्यूझीलंड या विजायसह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी दुसरा सामना हा 'करो या मरो' असा आहे.
भारतीय क्रिकेट संघ मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना 24 ऑक्टोबरपासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये होणार आहे. रोहित शर्मा याच्याकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर टॉम लॅथम न्यूझीलंडची धुरा सांभाळत आहे. या दुसऱ्या कसोटी सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 9 वाजता टॉस होणार आहे. न्यूझीलंडने या मालिकेतील सलामीच्या सामन्यात टीम इंडियावर विजय मिळवत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे टीम इंडियासाठी दुसरा सामना हा ‘करो या मरो’ असा आहे.
न्यूझीलंडने पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात 46 धावांवर ऑलआऊट केलं होतं. मात्र त्यानतंर टीम इंडियाने दुसऱ्या डावात कमबॅक करच चिवट प्रतिकार केला होता. मात्र न्यूझीलंडने विजयासाठी मिळालेलं 107 धावांचं आव्हान हे 2 विकेट्स गमावून विजय मिळवला.न्यूझीलंडने यासह 1988 नंतर भारतात कसोटी सामना जिंकण्याची कामगिरी केली आणि यजमानांना मायदेशात पराभवाची धुळ चारली. त्यामुळे न्यूझीलंकडे दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. तर टीम इंडियासाठी हा दुसरा सामना नसून मालिका आहे. टीम इंडियाला मालिकेतील आव्हान कायम राखायचं असेल, तर कोणत्याही स्थितीत पुणे कसोटी सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे टीम इंडियाला सर्वोत्तम प्लेइंग ईलेव्हनसह मैदानात उतरण्याचं आव्हान असणार आहे.
गुरुवारपासून दुसरा कसोटी सामना
📍 Pune
The second #INDvNZ Test begins tomorrow 🗓️
🏟️ Maharashtra Cricket Association Stadium ⏰ 9:30 AM IST 💻📱 https://t.co/Z3MPyeKtDz#TeamIndia | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/9NpRF0S92J
— BCCI (@BCCI) October 23, 2024
दुसऱ्या आणि तिसऱ्या विकेटसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि वॉशिंग्टन सुंदर.
दुसऱ्या आणि तिसऱ्या विकेटसाठी न्यूझीलंड टीम : टॉम लॅथम (कॅप्टन), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉनव्हे, मॅट हेनरी, डॅरल मिचेल, विल ओ रुर्के, एझाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, जेकब डफी, इश सोढी (दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी), टीम साउथी, केन विलियमसन आणि विल यंग.