IND vs NZ : आर अश्विनचा डबल धमाका, न्यूझीलंड विरुद्ध 3 विकेट्ससह एकाच खेळाडूला दोनदा झटका
R Ashwin World Record : आर अश्विनने पुणे कसोटीत न्यूझीलंडला पहिल्या डावात 3 झटके दिले. अश्विनने या 3 विकेट्ससने 2 कारनामे केले आहेत.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील पहिल्याच दिवशी टीम इंडियाचा अनुभवी ऑफ स्पिनर आर अश्विन याने इतिहास घडवला आहे. आर अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर या फिरकी जोडीने न्यूझीलंडला 259 धावांवर ऑलआऊट केलं. वॉशिंग्टन सुंदर याने सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. तर आर अश्विन याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. अश्विनने या 3 विकेट्स घेत 2 रेकॉर्ड् उद्धवस्त केले. यात एका वर्ल्ड रेकॉर्ड्चा समावेश आहे
न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम याने नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र टीम इंडियाने न्यूझीलंडला ठराविक अंतराने 3 झटके दिले. एकट्या अश्विननेच या पहिल्या 3 विकेट्स घेतल्या. अश्विनने टॉम लॅथम, विल यंग आणि डेव्हॉन कॉनव्हे या तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. अश्विनने यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. तसेच अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायन याचा सर्वाधिक विकेट्सचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला.
अश्विनने 2019 पासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासातील 39 व्या सामन्यात 189 विकेट्स घेत नॅथन लायन याला मागे टाकलं. नॅथनने 43 सामन्यात 187 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच अश्विन नॅथनला मागे टाकत कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा सातवा आणि पहिला सक्रीय गोलंदाज ठरला आहे.
Wtc इतिहासात सर्वाधिक विकेट्स
आर अश्विन, 39 सामने, 189 विकेट्स नॅथन लायन, 43 सामने, 187 विकेट्स पॅट कमिन्स, 42 सामने, 175 विकेट्स मिचेल स्टार्क, 38 सामने, 147 विकेट्स स्टूअर्ट ब्रॉड, 33 सामने, 134 विकेट्स
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विके्टस
मुथैय्या मुरलीथरन – 800 शेन वॉर्न – 708 जेम्स एंडरसन – 704 अनिल कुंबळे – 619 स्टूअर्ट ब्रॉड -604 ग्लेन मॅकग्रा – 563 आर अश्विन – 531 नॅथन लायन – 530
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, आकाश दीप आणि जसप्रीत बुमराह
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.