IND vs NZ : पुणे कसोटीत दिग्गज आर अश्विनकडून वर्ल्ड रेकॉर्ड उद्धवस्त, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाचा माज उतरवला
R Ashwin Milestone : टीम इंडियाचा दिग्गज स्पिनर आर अश्विन याने पुणे कसोटीत इतिहास घडवला आहे. अश्विनने वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाला मागे टाकलं आहे.
रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया पुण्यात न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळत आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. आर अश्विन याने त्याच्या कोट्यातील पहिल्याच ओव्हरमध्ये टीम इंडियाला पहिल्या सत्रात विकेट मिळवून दिली आणि न्यूझीलंडला पहिला झटका दिला. तसेच अश्विनने पहिल्याच सत्रात वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. अश्विनने यासह ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाजाला मागे टाकत त्याचा माज उतरवला आहे.
अश्विनने पहिल्या सत्रात न्यूझीलंडला एकूण 2 झटके दिले. अश्विनने न्यूझीलंडचा कॅप्टन टॉम लॅथम आणि त्यानंतर विल यंग या दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. अश्विनने या 2 विकेट्ससह इतिहास घडवला. अश्विन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. अश्विनच्या नावावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत एकूण 188 विकेट्सची नोंद झाली आहे.
नॅथन लायनचा रेकॉर्ड उद्धवस्त
भारत-न्यूझीलंड दुसऱ्या कसोटीआधी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्सचा विक्रम हा ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायन याच्या नावावर होता. नॅथनच्या खात्यात 187 विकेट्सची नोंद होती. मात्र त्याला मागे टाकत अश्विन आता नंबर 1 ठरला आहे. तसेच या यादीत पहिल्या 5 गोलंदाजामध्ये ऑस्ट्रेलियाच्या तिघांचा आणि इंग्लंड आणि टीम इंडियाच्या प्रत्येकी 1-1 गोलंदाजाचा समावेश आहे.
Wtc इतिहासात सर्वाधिक विकेट्स
आर अश्विन- 188 नॅथन लायन- 187 पॅट कमिन्स- 175 मिचेल स्टार्क-147 स्टुअर्ट ब्रॉड- 134
आर अश्विन जगात भारी
R Ashwin has gone past Nathan Lyon to become the leading wicket-taker across all World Test Championships.
Full list: https://t.co/NqNBLMiaFx pic.twitter.com/CK1LUbuffF
— Wisden India (@WisdenIndia) October 24, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, आकाश दीप आणि जसप्रीत बुमराह
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.