IND vs NZ : एकट्या मिचेल सँटनरने हवा काढली, टीम इंडियाला 156वर गुंडाळलं, न्यूझीलंडला 103 धावांची आघाडी

India vs New Zealand 2nd Test : न्यूझीलंडने टीम इंडियाला पहिल्या डावात 159 धावांवर गुंडाळून 103 धावांची मोठी आघाडी घेतली आहे. मिचेल सँटनर याने टीम इंडियाच्या 7 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

IND vs NZ : एकट्या मिचेल सँटनरने हवा काढली, टीम इंडियाला 156वर गुंडाळलं, न्यूझीलंडला 103 धावांची आघाडी
mitchell santner 7 wickets new zealand teamImage Credit source: blackcaps x account
Follow us
| Updated on: Oct 25, 2024 | 1:31 PM

टीम इंडियाच्या फलंदाजांनी न्यूझीलंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी घोर निराशा केली. मिचेल सँटरन याच्या फिरकीसमोर भारतीय गोलंदाजांनी गुडघे टेकले. टीम इंडियाचा डाव 259 च्या प्रत्युत्तरात 159 धावांवर आटोपला आणि त्यामुळे न्यूझीलंडला 103 धावांची बहुमुल्य आघाडी मिळाली. मिचेल सँटनर याची भारतात आणि कसोटी कारकीर्दीत 5 विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली. मिचेल सँटनर याने सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. भारताने दुसऱ्या दिवशी 1 बाद 16 पासून खेळाला सुरुवात केली. मात्र दुसऱ्या सत्रातच सँटनरने करेक्ट कार्यक्रम केला आणि डाव गुंडाळला. फलंदाज अपयशी ठरल्याने आता पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे.

9 विकेट्स आणि 140 धावा

दरम्यान टीम इंडियाला दुसऱ्या दिवशी 9 विकेट्स गमावून 140 धावाच करता आल्या. वॉशिंग्टन सुंदर याच्या 7 आणि आर अश्विनच्या 3 विकेट्सच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडला 259 धावांवर पहिल्या दिवशी ऑलआऊट केलं. त्यानंतर रोहित शर्मा 0वर आऊट झाला. शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वालव या जोडीने 1 बाद 16 पासून दुसर्‍या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र टीम इंडियाला 9 विकेट्सच्या मोबदल्यात 140 धावांचीच भर घालता आली. टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करुन डाव सावरता आला नाही.

तु चल मी आलो

यशस्वी आणि शुबमन या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. मात्र मिचेल सँटनर याने ही जोडी फोडली. शुबमन गिल भारताच्या 50 धावा असताना एलबीडबल्यू आऊट झाला. शुबमन 30 धावा करुन माघारी परतला. इथून टीम इंडियाची पडझड सुरु झाली. न्यूझीलंडने टीम इंडियाला झटक्यावर झटके देत गुंडाळलं.शुबमननंतर विराट कोहली 1, यशस्वी जयस्वाल 30, ऋषभ पंत 18, सर्फराज खान 11, आर अश्विन 4 आणि आकाश दीप याने 6 धावा केल्या. तर जसप्रीत बुमराह झिरोवर आऊट होताच भारताचा डाव आटोपला. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनर व्यतिरिक्त ग्लेन फिलिप्स याने दोघांना बाद केलं. तर टीम साऊथीने 1 विकेट घेतली.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, आकाश दीप आणि जसप्रीत बुमराह

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.