IND vs NZ : टीम इंडियाची न्यूझीलंड विरुद्ध दुर्दशा, 34 वर 6 विकेट्स, चौघे आले तसेच गेले, रोहित-विराट फ्लॉप
India vs New Zealand 1st Test : टीम इंडियाची न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या डावात दुर्दशा झाली आहे.टीम इंडियाने पहिल्या सत्रात 6 विकेट्स गमावल्या आहेत. त्यापैकी चौघांना भोपळाही फोडता आलेला नाही.
टीम इंडियाच्या फलंदाजांना झालंय तरी काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. टीम इंडियाची न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी दुर्दशा झाली आहे. उभयसंघातील पहिल्या सामन्यातील पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी टॉस झाला. टीम इंडियाने टॉस जिंकून कॅप्टन रोहित शर्माने बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र न्यूझीलंडने टीम इंडियाला पहिल्याच सत्रात 6 झटके देत पूर्णपणे बॅकफुटवर ढकललंय. इतकंच नाही तर टीम इंडियाच्या 6 पैकी चौघांना भोपळाही फोडता आला नाही. रवींद्र जडेजाच्या रुपात भारताने 34 धावा असताना सहावी विकेट गमावली आणि पहिल्या सत्राचा खेळ संपला. त्यामुळे आता टीम इंडिया 100 धावांच्या आतच ऑलआऊट होते की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.
टीम इंडियाची घसरगुंडी
रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ही सलामी जोडी खेळायला आली. टीम इंडियाने संथ सुरुवात केली. सातव्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर पहिली विकेट टाकली. कॅप्टन रोहित 2 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आला तसाच माघारी गेला. विराटला नवव्या बॉलवर बाद झाला. विराटला 8 बॉल खेळूनही खातं उघडता आलं नाही. तर त्यानंतर डेव्हॉन कॉनव्हे याने सर्फराज खान याचा सुरेख कॅच घेतला. सर्फराजला दुखापतग्रस्त शुबमन गिल याच्या जागी संधी देण्यात आली. मात्र सर्फराजला त्या संधीचा फायदा करुन घेता आला नाही.
सर्फराजनंतर यशस्वी जयस्वालही आऊट झाला. यशस्वीने 63 बॉलमध्ये 13 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाची 4 बाद 33 अशी स्थिती झाली. यशस्वीनंतर लोकल बॉय केएल राहुल मैदानात आला. केएलकडून अनेक अपेक्षा होत्या. मात्र केएलनेही तेच केलं जे इतरांनी केलं. केएलनेही सहाव्या बॉलवर मैदानाबाहेरचा रस्ता धरला. केएललाही खातं उघडता आलं नाही. केएलननंतर मैदानात आलेला रवींद्र जडेजा सहाव्या बॉलवर झिरोवर आऊट होऊन माघारी परतला. टीम इंडियाचा स्कोअर यासह 23.5 ओव्हरमध्ये 6 बाद 34 असा झाला. त्यानंतर लंचब्रेक झाला.
टीम इंडिया फुस्स
Lunch for Day 2 of the Bengaluru Test! #TeamIndia 34/6 after the end of the First Session.
We shall be back for the Second Session shortly!
Match Updates ▶️ https://t.co/8qhNBrrtDF#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/JFFStMSbo8
— BCCI (@BCCI) October 17, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टीम साउथी, एजाझ पटेल आणि विल्यम ओरूर्के.