IND Vs NZ, 3rd ODI, Live Streaming : तिसरा एकदिवसीय सामना कुठे, कधी आणि केव्हा पाहता येणार?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा सामना हा इंदूरमध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाला श्रीलंकेनंतर न्यूझीलंडला क्लिन स्वीप देण्याची संधी आहे.
इंदूर : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मंगळवारी तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना खेळवण्यात येणार आहे. मालिकेतील पहिले 2 सामने जिंकून टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेला क्लीन स्वीप केला होता. आता न्यूझीलंडला क्लीन स्वीप देण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. आगामी वर्ल्ड कप 2023 च्या दृष्टीने एकदिवसीय मालिकेला फार महत्व आहे. त्यामुळे टीम इंडियाने न्यूझीलंडला क्लीन स्वीप केल्यास ती एक उल्लेखनीय कामगिरी ठरेल.
मालिकेतील तिसरा सामना हा इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्टेडियमवर जवळपास 6 वर्षांनी एकदिवसीय सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. सामन्याच्या एकदिवसाआधी सोमवारी स्टेडियम परिसरात विशेष करुन युवा वर्गाची एकच गर्दी दिसून आली.
जाणून घ्या सामन्याबद्दल सर्व काही
तिसरा सामना कुठे पाहता येणार?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा सामना हा 24 जानेवारी मंगळवारी खेळवण्यात येणार आहे.
तिसऱ्या सामन्याचं आयोजन कुठे?
या तिसऱ्या सामन्याचं आयोजन हे इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
सामन्याला सुरुवात केव्हा होणार?
तिसऱ्या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजता टॉस उडवला जाईल.
लाईव्ह मॅच कुठे पाहता येईल?
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना हा स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार?
वैयक्तिक कारणांमुळे प्रत्येकाला घरीबसून टीव्हीवर सामना पाहता येत नाही. अशांना हॉटस्टारवर लाईव्ह सामना पाहता येईल. मात्र त्यासाठी सब्सक्रिप्शन असायला हवं.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), विराट कोहली, रजत पाटीदार, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक.
न्यूजीलंड: टॉम लॅथम (कर्णधार), फिन एलेन, मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमैन, डेवोन कॉनवे, जॅकब डफी, लॉकी फर्ग्यूसन, डेरिल मिचेल, हेनरी निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मिचेल सॅंटनर, हेनरी शिपले, ईश सोढी आणि ब्लेयर टिकनर.