इंदूर : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने मोठा कारनामा केलाय. रोहितने न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंदूरमध्ये महारेकॉर्ड केलाय. आतापर्यंत जे सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली जे करु शकले नाहीत, ते रोहितने करुन दाखवलंय. रोहित हा महारेकॉर्ड करणारा पहिला भारतील आणि एकूण तिसरा बॅट्समन ठरला आहे.
रोहितने न्यूझीलंड विरुद्ध शतक ठोकलं. रोहितच्या वनडे कारकीर्दीतील हे 30 वं शतक ठरलं. रोहितने या शतकी खेळीदरम्यान 6 सिक्स आणि 9 फोर ठोकले. यासह रोहितने आपल्या नावे भीमपराक्रम केला.
रोहित टीम इंडियाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. न्यूझीलंड विरुद्ध चौथा सिक्स ठोकताच रोहितने हा महारेकॉर्ड आपल्या नावावर केला. रोहितने न्यूझीलंड विरुद्ध 85 बॉलमध्ये 101 धावांची खेळी केली. यामध्ये 6 सिक्स आणि 9 चौकारांचा समावेश होता. रोहितच्या नावावर आता 273 सिक्सची नोंद आहे.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्सचा वर्ल्ड रेकॉर्ड हा पाकिस्तानचा माजी ऑलराउंडर शाहिद आफ्रिदी याच्या नावावर आहे. आफ्रिदीने 351 सिक्स ठोकले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर विंडिजचा ख्रिस गेल आहे. गेलच्या नावावर 331 सिक्सची नोंद आहे. तर तिसऱ्या स्थानी 273 सिक्ससह रोहित शर्मा विराजमान आहे. रोहितने जे केलंय ते सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यासारख्या मातब्बर फलंदाजांनाही जमलेलं नाही.
शाहिद आफ्रिदी – 351 सिक्स
ख्रिस गेल – 331 सिक्स
रोहित शर्मा -273 सिक्स
सनथ जयसूर्या – 270 सिक्स
महेंद्रसिंह धोनी- 229 सिक्स
रोहित शर्मा -273 सिक्स
महेंद्रसिंह धोनी- 229 सिक्स
सचिन तेंदुलकर – 195 सिक्स
सौरव गांगुली – 190 सिक्स
युवराज सिंह – 155 सिक्स
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन – रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल आणि उमरान मलिक.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : फिन एलन, डेवन कॉनवे, हेनरी निकल्स, डॅरेल मिचेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, जॅकब डफी, ब्लेयर टकनर आणि लॉकी फर्ग्यूसन.