IND vs NZ : दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला, न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात 9 बाद 171 धावा
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरु आहे.या सामन्यात भारताची मजबूत पकड दिसत आहे. खरंच पुणे कसोटी सामनाही भारताच्या पारड्यात झुकलेला होता. पण दुसऱ्या डावात धडाधड विकेट पडल्या होत्या. त्यामुळे तिसरा कसोटी सामना जिंकणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारत आहेत.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यातील दुसऱ्या न्यूझीलंडने 9 गडी बाद 171 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात भारताकडे 28 धावांची आघाडी होती. त्यामुळे न्यूझीलंडच्या आता 143 धावा झाल्या असून एक विकेट शिल्लक आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात न्यूझीलंडचा डाव 200 च्या आत आटपेल असा अंदाज आहे. एजाज पटेल नाबाद 7 आणि विल्यम ओरुर्के अजून फलंदाजीला यायचा आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवशीच या सामन्याच निकाल लागण्याची शक्यता आहे. पण मागच्या दोन कसोटी भारताची फलंदाजी पाहता आतापासून क्रीडारसिकांना धाकधूक लागून आहे. 150 धावाही दुसऱ्या डावात भरपूर होतीत असा अंदाज क्रीडारसिक बांधत आहेत. त्यात दिग्गज खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर गणना असलेले विराट कोहली आणि रोहित शर्मा मैदानात फक्त हजेरी लावायला येतात असं वाटतंय. कारण गेल्या काही सामन्यात हे दोघंही वारंवार फेल जात आहेत. त्यामुळे क्रीडारसिकांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, दुसऱ्या डावात न्यूझीलंडकडून विल यंग वगळता एकही फलंदाज तग धरू शकला नाही. विल यंगने 100 चेंडूचा सामना करत 2 चौकार आणि 1 षटकार मारत 51 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे न्यूझीलंडला 171 धावांपर्यंत मजल मारता आली. या व्यतिरिक्त डेवॉन कॉनवेने 22, डेरिल मिशेलने 21, तर ग्लेन फिलिप्सने 26 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त एकही फलंदाज चांगली कामगिरीकरू शकला नाही. टॉम लॅथम 1, रचिन रवींद्र 4, टॉम ब्लंडेल 4, इश सोढी 8, मॅट हॅरी 10 धावा करून बाद झाले. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 4 गडी बाद केले. आर अश्विनने 3, तर आकाश दीपने आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, इश सोधी, मॅट हेन्री, एजाज पटेल, विल्यम ओरोर्क
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, मोहम्मद सिराज.