IND vs NZ : गंभीरचा लाडका न्यूझीलंडविरुद्ध मुंबईत तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात खेळणार?
India vs New Zealand 3rd Test : दुसर्या कसोटी सामन्यासाठी वॉशिंग्टन सुंदर याचा संघात समावेश करुन त्याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली होती. त्यानंतर आता तिसऱ्या आणि अंतिम सामन्यासाठी अशाच प्रकारे आणखी एका खेळाडूला संधी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.
टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात मायदेशात कसोटी मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्याचं आयोजन हे 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. न्यूझीलंडने ही मालिका जिंकली आहे. न्यूझीलंड या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे व्हाईटवॉशने पराभव टाळण्यासाठी टीम इंडिया रणनिती आखल्याचं समजतंय. टीम इंडिया तिसऱ्या सामन्यात हर्षित राणा याचा समावेश करु शकते, असं म्हटलं जात आहे. टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर हर्षित राणा याची कामगिरी काही महिन्यांपासून पाहतोय. त्यामुळे हर्षितला मुंबई कसोटीतून पदार्पणाची संधी मिळू शकते.
टीम इंडिया या मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. बीसीसीआयने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी जाहीर केलेल्या 18 सदस्यीय संघात हर्षित राणा याचा समावेश करण्यात आला आहे. हर्षितला त्या मालिकेत संधी मिळू शकते. मात्र त्याआधी हर्षितला मुंबईत संधी देऊन त्याची ‘टेस्ट’ करण्याचा मनस्थितीत टीम मॅनेजमेंट असू शकते. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, हर्षित राणा याला मुंबई कसोटीतून पदार्पणाची संधी मिळणार असल्याचं जवळपास निश्चित आहे.
गंभीरचा खास भिडू
गौतम गंभीर हर्षित राणावर लक्ष ठेवून आहे. हर्षित राणा आयपीएलमध्ये कोलकाताकडून खेळतो. तर गंभीर टीम इंडियाचा कोच होण्याआधी कोलकाताचा मेन्टॉर होता. अशात गंभीरने राणाला जवळून पाहिलंय. गंभीरला राणाची जमेची बाजू माहित आहे. तसेच राणाची फर्स्ट क्रिकेटमधील कामगिरीही शानदार आहे.
हर्षित राणाचं फर्स्ट क्लास करियर
हर्षित राणाने आतापर्यंत 10 सामन्यांमध्ये 43 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच एका डावात 45 धावांच्या मोबदल्यात 7 विकेट्स ही राणाची सर्वोत्तम कामगिरी आहे.
तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि वॉशिंग्टन सुंदर.
तिसऱ्या सामन्यासाठी न्यूझीलंड टीम : टॉम लॅथम (कॅप्टन), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉनव्हे, मॅट हेनरी, डॅरल मिचेल, विल ओ रुर्के, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, जेकब डफी, इश सोढी, टीम साउथी आणि विल यंग.