IND vs NZ : रवींद्र जडेजाकडून ‘पंच’नामा, न्यूझीलंडचं पहिल्या डावात 235 धावांवर पॅकअप
India vs New Zealand 3rd Test Day 1 : टीम इंडियाच्या फिरकी जोडीने अप्रतिम बॉलिंग करत न्यूझीलंडच्या 9 फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवलं. तर आकाश दीप याने चांगली साथ दिली.
टीम इंडियाच्या रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या फिरकी जोडीने न्यूझीलंडला तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी 235 धावांवर गुंडाळलं आहे. पहिल्या 2 सामन्यात टीम इंडियावर वरचढ ठरणाऱ्या न्यूझीलंडच्या फलंदाजांना या जोडीने झटपट आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.त्यामुळे टीम इंडियाला न्यूझीलंडला 250 धावांच्या आत रोखण्यात यश आलं. गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडली आहे. त्यामुळे आता भारतीय फलंदाजांकडून न्यूझीलंडसमोर मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.
न्यूझीलंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. मात्र न्यूझीलंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर छाप सोडू शकले नाहीत. आकाश दीप याने डेव्हॉन कॉनव्हे याला 4 रन्सवर एलबीडबल्यू आऊट करत टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर टीम वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा हीच जोडी न्यूझीलंडला पुरून उरली. आधी वॉशिंग्टन सुंदर याने न्यूझीलंडला काही झटके दिले. त्यानंतर जडेजाने आपल्या फिरकीत न्यूझीलंडला फसवलं.
न्यूझीलंडची बॅटिंग
न्यूझीलंडकडून फक्त चौघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. तर दोघांना भोपळाही फोडता आला नाही. न्यूझीलंडसाठी डॅरेल मिचेल याने सर्वाधिक 82 धावांची खेळी केली. विल यंग याने 138 बॉलमध्ये 71 रन्स केल्या. कॅप्टन टॉम लॅथम याने 28 तर ग्लेन फिलिप्स याने 17 धावा केल्या. टॉम ब्लंडेल आणि मॅट हॅन्री या दोङांना खातंही उघडता आलं नाही. तर इतर फलंदाजांनी टीम इंडियाच्या फिरकी जोडीसमोर गुडघे टेकले. रवींद्र जडेजाने विकेट्स घेतल्या. तर वॉशिंग्टन सुंदर याने चौघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
जडेजाची ‘सुंदर’ कामगिरी
Innings Break!
Solid bowling display from #TeamIndia! 💪 💪
5⃣ wickets for Ravindra Jadeja 4⃣ wickets for Wahsington Sundar 1⃣ wicket for Akash Deep
Scorecard ▶️ https://t.co/KNIvTEy04z#TeamIndia | #INDvNZ | @imjadeja | @Sundarwashi5 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/H91914qtgt
— BCCI (@BCCI) November 1, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनव्हे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, इश सोधी, मॅट हेन्री, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.