IND vs NZ : न्यूझीलंडने टॉस जिंकला, जसप्रीत बुमराह आऊट, टीम इंडियाला झटका

India vs New Zealand 3rd Test Toss: न्यूझीलंड या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. तर तिसऱ्या सामन्यात पाहुण्या संघाने टीम इंडिया विरुद्ध टॉस जिंकला आहे. पाहा दोन्ही संघांची प्लेइंग ईलेव्हन.

IND vs NZ : न्यूझीलंडने टॉस जिंकला, जसप्रीत बुमराह आऊट, टीम इंडियाला झटका
ind vs nz 3rd test toss playing 11
Follow us
| Updated on: Nov 01, 2024 | 9:42 AM

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अंतिम कसोटी सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंड या 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे पाहुण्या न्यूझीलंडकडे तिसरा सामना जिंकून टीम इंडियाला व्हाईटवॉश करण्याची संधी आहे. तर टीम इंडियासमोर लाज वाचवण्याचं आव्हान आहे. रोहित शर्मा याच्याकडे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर टॉम लॅथम न्यूझीलंडचं नेतृत्व करणार आहे. सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 9 वाजता टॉस झाला. न्यूझीलंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. टॉम लॅथम याने बॅटिंगचा निर्णय केला.

दोन्ही संघात बदल

टीम इंडिया आणि न्यूझीलंड दोन्ही संघांनी अंतिम सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. टीम इंडियाला नाईलाजाने बदल करावा लागला आहे. आजारपणामुळे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला बाहेर बसावं लागलं आहे. त्याच्या जागी मोहम्मद सिराज याचा समावेश करण्यात आला आहे. तर न्यूझीलंडने 2 बदल केले आहेत. मिचेल सँटनर आणि टीम साऊथी हे दोघे बाहेर पडे आहेत. तर इश सोढी आणि मॅट हॅन्री यांचा समावेश करण्यात आला आहे.

भारतासाठी प्रतिष्ठेचा सामना

दरम्यान टीम इंडियासाठी हा प्रतिष्ठेचा सामना आहे. भारताला अद्याप मायदेशात 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉशने पराभूत व्हावं लागलेलं नाही. मात्र या तिसऱ्या सामन्यात भारतावर 3-0 ने व्हाईटवॉश होण्याची टांगती तलवार आहे. ही नामुष्की रोखायची असेल, तर भारताला हा सामना जिंकावा किंवा ड्रॉ करावा लागणार आहे.

न्यूझीलंड टॉसचा बॉस

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनव्हे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, इश सोधी, मॅट हेन्री, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.